सां.बा विभागात ठाण मांडून बसलेल्या ठाणेदाराला अखेर शिवसेनेचा दणका

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
मिरज शिवसेनेचे उपशहर प्रमुख सादिक पठाण यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला दणका दिला आहे. मिरज सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यांची कामात कसूर केल्याने कवठेमहांकाळ येथे बदली करण्यात आली आहे.
मिरजेतील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये एक खुर्चीवर ठाण मांडून बसलेल्या शाखा अभियंत्याची अखेर बदली झाली आहे. हा शाखा अभियंता याची बदली कवठेमहांकाळ या ठिकाणी झाली असून देखील सुद्धा तो मिरजेतच ठाण मांडून बसला होता. वारंवार या शाखा अभियंताच्या नावाची तक्रार नागरिकातून येत होती. या शाखा अभियंता चे नाव अबूबकर शेख असे असून वारंवार कामे होत नसल्याने यांची तक्रार येत होती. तर कवठेमहांकाळ येथे बदली असून देखील हा शाखा अभियंता मिरजेतच ठाण मांडून बसला होता.
अशीच तक्रार शिवसेना उपशहर प्रमुख सादिक पठाण यांच्याकडे आली असता त्यांनी माहिती अधिकाराद्वारे माहिती प्राप्त केली. त्यामध्ये या शाखा अभियंत्याची कवठेमहांकाळ येथे बदली झाली असून देखील हा शाखा अभियंता मिरजेतच ठाण मारून बसला आहे हे लक्षात आले. यावेळी उपशहर प्रमुख सादिक पठाण यांनी पाठपुरवठा करून अखेर त्या अभियंत्याची बदली केली ही बदली केल्याने नागरिकांतूनही सादिक पठाण यांचे कौतुक केले जात आहे. तर न होणारी बदली झाल्याने सादिक पठाण यांनी समाधान व्यक्त केले आहे.