मिरजेत अखेर भाजपवर मात ; प्रा. मोहन वनखंडेंनी पकडला काँग्रेसचा हात

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
मिरज विधानसभा क्षेत्राचे भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव मोहन वनखंडे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापुरात प्रा. मोहन वनखंडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यांच्या काँग्रेस प्रवेशाने भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री सतेज पाटील, माजी मंत्री विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील आणि अन्य काँग्रेसचे वरिष्ठ नेते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
विद्यमान पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक आणि त्यांचे खाजगी स्विय सहाय्य प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी यापूर्वीच सुरेश भाऊ यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवलं होतं. पक्षाकडून आपल्याला डावलले जात असल्याचा आरोप ही त्यांनी केला होता. काही दिवसापूर्वी त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं होतं. जनसुराज्य युवाशक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आणि प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी मिरजेत सलग दोन वर्ष दहीहंडी सोहळा आयोजित करून मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं. जनसुराज्य पक्षाने सुद्धा महायुतीकडे मिरज विधानसभा मतदारसंघाची मागणी केली होती. वनखंडे यांनी भाजपाकडून उमेदवारी मागितली होती. मात्र, आता त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून मोहन वनखंडे यांच्याकडे बघितले जात आहे. तर आता मोहन वनखंडे यांनी काॅग्रेसमध्ये प्रवेश केल्याने मिरज विधानसभेला रंग येणार असल्याचे चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याचबरोबर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते मा. खासदार राहुल गांधी यांच्या कोल्हापूर येथील संविधान सन्मान सभेस उपस्थितीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब व खासदार प्रणिती शिंदे उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रभारी मा. रमेशजी चेंनींथला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा.आ. नानाभाऊ पटोले, मा. मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज (बाबा) चव्हाण, विधानसभा विरोधीपक्ष नेते मा.विजयजी वड्डेट्टीवार, मा.आ.विश्वजीत कदम (बाळासाहेब), मा. खा. विशाल (दादा) पाटील, मा.आ.भाई जगताप, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील, सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा. पृथ्वीराज (बाबा) पाटील, भारती सहकारी बँकेचे संचालक मा. जितेश (भैय्या) कदम तसेच काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते मा. बाळासाहेब थोरात उपस्थित होते.