कीटक नाशक पिऊन राहत्या घरी आत्महत्या

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
मिरज | लिंगणूर (ता.मिरज) येथील कैलास वीरभद्र चौधरी (वय-४५) यांनी कर्जबाजारी झाल्यामुळे राहत्या घरी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली आहे. ही घटना 30 जानेवारी रोजी घडली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कैलास वीरभद्र चौधरी सद्या राहणार-लिंगनूर यांनी जमिनीच्या वादातून व कर्जबाजारी झाल्यामुळे व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग करून आत्महत्या केली आहे. आत्महत्यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई करावी. यासाठी काल राहत्या घरी कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. कीटकनाशक पिल्यानंतर कैलास यास तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी असा परिवाराचे. जमिनीच्या वादातून व्हिडिओ रेकॉर्डिंग करून कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्यात आली आहे.
गावातील जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी तातडीने कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्या पत्नीने केली आहे. याप्रकरणी काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित शिद्द यांनी सर्व माहिती घेऊन लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होईल. असे सांगितले आहे.
याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवालदार संदीप शिंदे अधिक तपास करत आहेत.