सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार फुलचंद भगत यांना ‘राज्यस्तरीय क्रांतीसूर्य पुरस्कारा’ ने सन्मानित

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
वाशिम जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. दि.५ जानेवारी रोजी पुणे येथील ज्ञानज्योती साविञीबाई फुले सांस्कृतिक सभागृह येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये पञकार व सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना ट्राफी, मेडल, सन्मानपञ आणि फेटा देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
सामाजिक कार्याच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा करीत असलेले व आपल्या लेखणीव्दारेही तळागाळातल्यांचा आवाज शासनदरबारी पोहचवून सर्दैव न्याय देण्याची भूमिका जोपासत असलेले पञकार तथा सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना जगदीशब्द फाउंडेशन या सामाजिक संस्थेद्वारे आयोजित केलेल्या भव्यदिव्य पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘राज्यस्तरीय क्रांतीसूर्य पुरस्कार’ दि.5 जानेवारी पुणे येथे प्रदान करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राज्यस्तरिय क्रांतीज्योती, क्रांतिसूर्य व बापमाणूस पुरस्कारांचे वितरण रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वा. गंजपेठ येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये मोठ्या थाटामाटात पाहूण्यांच्या उपस्थितत संपन्न झाले. माजी सनदी अधिकारी व विचारवंत सुरेश खोपडे, सोलापूर विद्यापिठाचे सिनेट सदस्य प्रा.नितीन तळपाडे, मा.मुख्यमंञी यांचे ओएसडि मंगेश चिवटे, परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव वाघमारे, व्याख्याते व जग बदलणारा बापमाणूस या पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ यांच्या प्रमुख उपस्थितत पार पडला.
राज्यभरातून अनेक पुरस्कारार्थी या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते.यामध्ये वाशिम जिल्ह्यातील पञकार तथा सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना ‘राज्यस्तरीय क्रांतीसूर्य पुरस्काराने ट्राॅफी, सन्मानपञ, फेटा आणि पुस्तक देवून मान्यवरांनी सन्मानित केले. सदर कार्यक्रमामध्ये ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाच्या 30 व्या आवृत्तीचे प्रकाशनही झाले आहे.