सेक्युलर एज्युकेशन ट्रस्ट आयोजित बाल लैंगिक व महिला अत्याचार कायद्यासंबंधीत जनजागृती व्याख्यान

सौजन्य- आयु. रूपेश गमरे सर.
गोरेगाव रायगड दिनांक 28 ऑगस्ट 2024
सेक्युलर एज्युकेशन ट्रस्ट संस्थेच्या वतीने दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी वि.रा. मेहता सार्वजनिक वाचनालय गोरेगांव येथे बाल लैंगिक व महिला अत्याचार कायद्यासंबंधीत जनजागृती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सुरुवातीला छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन, रोपाला पाणी घालुन उद्घाटन करण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. सतीश म्हात्रे साहेब व सौ. रेखा मोहिते महिला पोलीस नाईक गोरेगांव उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन अॅड. उदय अधिकारी (ज्येष्ठ विधीज्ञ) यांनी भूषविले या कार्यक्रमास सेक्रेटरी सौ.क्षमा अधिकारी, पी.आय श्री. पाटील साहेब, व संस्थेचे विश्वस्त सदस्य श्री. प्रमोद जोशी इत्यादी तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माननीय चेअरमन अॅड. उदयजी अधिकारी यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना त्यांनी पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या मध्ये बाललैंगिक व महिला अत्याचारसंबधी जनजागृती होणे फार महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले.
त्यानंतर पोलीस स्टेशन मधील बाल व महिला सुरक्षा याविषयी जनजागृती व मार्गदर्शन महिला पोलीस नाईक गोरेगाव पोलीस स्टेशन सौ. रेखा सचिन मोहिते यांनी केले.
ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. सतीश म्हात्रे यांनी बाल लैगिंक कायदा, सुरक्षितता, आणि पालकांनी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन करताना सुजाण नागरिक व पालक म्हणून आपण कसे वागले पाहिजे, कोणती काळजी घेतली पाहिजे, मुलांना कोणते ज्ञान दिले पाहिजे याची माहिती दिली तसेच कायद्याच्या दृष्टिकोनातून एखादी घटना घडल्यास आपली जबाबदारी काय ? पालकांनी अशी एखादी घटना घडल्यास भीती लज्जा नबाळगता समोर येऊन अपराध्याला शिक्षा होणे गरजेचे आहे त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. असे आव्हान पालकांना केले तसेच कोणीही कोणत्याही प्रकारची भीती बाळगून नये.
कार्यक्रमाला समाज जनजागृतीच्या दृष्टिकोनातून सेक्युलर एज्युकेशन ट्रस्ट ने स्तुत्य उपक्रम राबवला त्यामुळे सर्व स्तरातून संस्थेचे कौतुक होत आहे कार्यक्रमाला गोरेगाव पंचक्रोशीतील अनेक गावातील पालक विद्यार्थी उपस्थित होते सर्व मान्यवरांचे, मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी पालक यांचे श्री. रुपेश गमरे सर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली


