आरगेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
आरग ता मिरज येथे सालाबाद प्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आवळे गल्ली येथे साजरी करण्यात आली. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्त्यव्यदक्ष पोलीस अधिकारी प्रकाश साळुंखे साहेब व समाजाचे अध्यक्ष सुहास बिरणगे यांच्या हस्ते लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
सक्सेस अकॅडमीचे अध्यक्ष प्रशांत चौगुले सर यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ काय होती व अण्णाभाऊंनी ती कशी चालवली याची माहिती दिली. आरगचे माजी उपसरपंच अजित कांबळे यांनी आभार मानले.
यावेळी प्रशांत चौगुले, अजित कांबळे, सुहास बिरनगे, संतोष चव्हाण, करीम कुडचे, सामाजिक कार्यकर्ते सागर आवळे, शुभम माळी, सतीश कांबळे, हणमंत व्हणाळे, विकास कांबळे तसेच आवळे गल्ली येथील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.