स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई ; पत्नीचा खून करणारा पसार पती ताब्यात

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
संजयनगर (सांगली) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहूनगर, विजयनगर येथे लाकडाच्या बांबूने पत्नीच्या कपाळावर व डोक्यात मारुन तिचा खून करून पसार झालेल्या आरोपीला सांगली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आंत्रोळी ता. मंगळवेढा, जि. सोलापूर येथून अटक केली आहे.
पिंटू तुकाराम पाटील (वय ३६ वर्षे, धंदा- मजूरी) रा. शाहुनगर, विजयनगर, सांगली, मुळगाव हुलजंती, ता. मंगळवेढा, जि. सोलापुर असे अटक केलेले संशयित आरोपीचे नाव आहे. शिलावंती पिंटू पाटील (वय-३० वर्षे) असे मयत पत्नीचे नाव आहे. याबाबत संजयनगर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची अधिक माहिती अशी की, संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहूनगर, विजयनगर, सांगली येथे गुरुवार (ता. २६) रोजी शिलवंती पिंटू पाटील (वय.३०) वर्षे हिचा राहते घरी तिचा नवरा पिंटू पाटील याने लाकडाच्या बांबूने पत्नीच्या कपाळावर व डोक्यात मारुन तिचा खून केला. याबाबत संजयनगर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्ह्याचा छडा लावून आरोपीस ताब्यात घेणेबाबत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केले. त्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी एक पथक तयार केले .
सदर आरोपी हा आंत्रोळी ता.मंगळवेढा, जि. सोलापूर येथे असल्याची माहिती या पथकातील पोलीस गुंडोपंत दोरकर यांना बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक माहितीव्दारे मिळाली. मिळलेल्या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथक सोलापूर येथे रवाना झाले. सदर पथकाने त्या ठिकाणी जाऊन गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेऊन संशयितास आंत्रोळी ता. मंगळवेढा, जि. सोलापूर येथून ताब्यात घेतले.
सदर आरोपीकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता, आरोपी पत्नी शिलवंती हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातूनच त्याचा रात्री वाद झाला होता. त्या वादातून पत्नी झोपलेनंतर आरोपीने घरातील लाकडी दांडक्याने तिचे डोकीत मारुन तिचा खून केला असल्याची कबूली दिली आहे. आरोपीला ताब्यात घेऊन संजयनगर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले. यापुढील अधिक तपास संजयनगर पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शानाखाली पोनि/ सतिश शिंदे, उपोनि / कुमार पाटील, पोलीस गुंडोपंत दोरकर, संदीप पाटील, अतुल माने, सुशिल मस्के, श्रीधर बागडी, अभिजीत माळकर, ऋतुराज होळकर, विनायक सुतार, सुमित सुर्यवंशी, सुशांत चिले सायबर पोलीस ठाणे अभिजीत पाटील यांनी केली आहे.