हजारो झाडांची कत्तल ; शासन गप्प, माफिया अॅक्टिव्ह

LiE NEWS | UPDATE
संभाजीनगर | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
कासार सिरसी प्रतिनिधी | निलंगा तालुक्यातील कासार सिरसी गावात पेट्रोलपंपा जवळून सिरसी बस स्टँडमार्गे धाराशिव जिल्हा हद्दपर्यंतच्या रस्त्यालगत हजारो हिरवीगार झाडांची बेकायदेशीरपणे कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही वृक्षतोड वन अधिनियम 1927 तसेच विविध पर्यावरण संरक्षक कायद्यांना पूर्णतः डावलून केल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
या अवैध वृक्षतोडीचे ठोस पुरावे, GPS लोकेशनसह व्हिडिओ, झाडांची लाकडे भरलेले TS 05 UB 0266 व KA 25 07995 क्रमांकाचे दोन ट्रक आणि रोडवर फेकून दिलेली हजारो झाडांची दृश्ये, यासह तक्रार वनसंरक्षक वनवृत (प्रा) छत्रपती संभाजीनगर कार्यालयात दाखल करण्यात आली आहे.
ही तक्रार “अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती” चे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी सादर केली असून, त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की दोषींवर त्वरित कठोर कारवाई न झाल्यास नागपूर येथील वनविभाग कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल. पर्यावरणाचे रक्षण करण्याचे ढोल बडवणारेच आज झाडांची कत्तल गप्प पाहत आहेत, ही बाब लोकशाहीस अत्यंत घातक आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शिष्टमंडळाने दिली आहे.
दि. 7 जुलै 2025 रोजी, छत्रपती संभाजीनगर येथे वनसंरक्षक प्रमोद चंद लाकर यांची भेट घेऊन, लातूरहून आलेल्या शिष्टमंडळाने सदर प्रकरणी चौकशी व कारवाईची मागणी केली. यावर वनसंरक्षकांनी तात्काळ धाराशिव विभागीय वन अधिकारी किशोर पोल यांना मोबाईलद्वारे संपर्क साधून निर्देशित केले की सदर अर्जात नमूद केलेल्या बाबीनुसार आपल्या स्वयंमस्पष्ट अभिप्रायासह अहवाल वनसंरक्षक प्रादेशिक कार्यालयाकडे पाठवण्यात यावे तसेच तक्रारदार यांना आपल्या स्तरावरून परस्पर उत्तर द्यावे, असा आदेश दिले.
तक्रार व्हॉट्सअॅप व ईमेलद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना पाठवून कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे आश्वासन खुद्द वनसंरक्षकांनी दिले आहे. “पर्यावरणाचे नाश थांबवा”, झाडे केवळ ऑक्सिजन देत नाहीत, तर ही आपली हिरवीगार श्वास आहेत. या बेकायदेशीर वृक्षहत्येवर जर आता कारवाई झाली नाही, तर उद्या उशीर झालेला असेल!”
तक्रार देताना संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष सलमान शेख, उपाध्यक्ष शेख बद्रोद्दीन, सचिव फिरोज पठाण, रमेश खताळ, सौदागर हुजैफा व इतर पदाधिकारी उपस्थित होते