बोलवाड येथे अंगणवाडीत CCTV कॅमेऱ्यांचे उद्घाटन
उपसरपंच सचिन दादा कांबळे यांचा स्वखर्च ; लहानग्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज | “नेतृत्व म्हणजे गाजावाजा नव्हे, तर काम करून दाखवणे” याचे उत्तम उदाहरण बोलवाड गावात घडले आहे. बोलवाड येथील अंगणवाडी क्रमांक 108 व 109 मध्ये लहानग्यांच्या सुरक्षेसाठी व परिसरातील शिस्त राखण्यासाठी उपसरपंच मा. सचिन दादा कांबळे यांनी स्वखर्चाने तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले. याचा शुभारंभ मिरज ग्रामीण पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक मा. अजित सिद साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
अंगणवाडी परिसरात काही नागरिकांकडून वारंवार अस्वच्छता केली जात असल्याचे सेविका व मदतनीस यांना जाणवले होते. त्याचबरोबर लहान मुलांच्या सुरक्षेसाठी अंगणवाडीत देखरेख प्रणालीची तातडीची गरज होती. या मागणीवर ग्रामपंचायतीकडे निधीची कमतरता असल्याने प्रश्न रखडला होता. मात्र, “लहानगे सुरक्षित असले पाहिजेत” या ध्येयाने प्रेरित होऊन उपसरपंच कांबळे यांनी स्वखर्चाने कॅमेरे बसविण्याचा धाडसी निर्णय घेतला.
या उपक्रमामुळे परिसरातील अस्वच्छतेला आळा बसेलच, पण मुलांच्या सुरक्षेची खात्री गावकऱ्यांना मिळणार आहे. उपसरपंचांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, “नेतृत्व म्हणजे फक्त आश्वासने नव्हे, तर काम करून दाखवणे” याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या उद्घाटन सोहळ्यास सरपंच सौ. निगार शेख, उपसरपंच सचिन दादा कांबळे, ग्रामपंचायत सदस्या सौ. वंदना खोत, पूजा नाईक, पुष्पवती पाटील, शहनाज हवालदार, ग्रामपंचायत अधिकारी दुर्गाडे मॅडम, सुभाषनगर टाकळी-बोलवाड बीट हवालदार मा. अमोल ढोले, सोसायटीचे माजी चेअरमन मा. प्रवीण पाटील, राजकुमार पाटील, माजी सरपंच जितेंद्र पाटील, शाळेचे मुख्याध्यापक विजय कुरणे, तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष सतीश गस्ते, हरून भाई शेख, ज्येष्ठ नागरिक रमजान चाचा शेख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गावातील तरुण कार्यकर्ते, शिक्षकवर्ग, अंगणवाडी सेविका-मदतनीस तसेच ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते. सर्व मान्यवरांनी उपसरपंचांच्या पुढाकाराचे मनःपूर्वक कौतुक केले.
मर्यादित उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतीवर अवलंबून न राहता गावाच्यामर्यादित उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतीवर अवलंबून न राहता गावाच्या भविष्यासाठी लोकप्रतिनिधी स्वतःहून पुढे आले, ही बोलवाडसाठी अभिमानास्पद बाब आहे. लहानग्यांच्या सुरक्षेला व परिसराच्या स्वच्छतेला प्राधान्य देत उचललेले हे पाऊल गावात विकास व जबाबदारीचा आदर्श निर्माण करणारे ठरणार आहे.