राजकीयविदर्भ

५२ पदांची जि.प. सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत जाहीर

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सोडत प्रक्रिया

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी एकूण ५२ गटांची आरक्षण सोडत आज दिनांक १३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी तथा पिठासिन अधिकारी (जि.प. निवडणूक) योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या सोडत प्रक्रियेस अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटीलनिवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी (जि.प. निवडणूक) राजेंद्र जाधव उपस्थित होते.

वाशिम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त, अमरावती यांनी मान्यता दिलेल्या आरक्षणानुसार एकूण ५२ गटांपैकी अनुसूचित जाती : ११ (सर्वसाधारण ५, महिला ६)
अनुसूचित जमाती : ४ (सर्वसाधारण २, महिला २)
नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र) : १४ (सर्वसाधारण ७, महिला ७) सर्वसाधारण वर्ग : २३ (सर्वसाधारण १२, महिला ११) असे आरक्षण ठरविण्यात आले.

अनुसूचित जातीसाठी आरक्षित गट ;
१७ पारवा, ३५ गोवर्धन, २९ ब्राह्मणवाडा, ४८ आडोळी, ४९ तोंडगाव, ५० उकळीपेन, ३६ रिठद, ३७ डोंगरकिन्ही, २ भामदेवी, २२ कंझरा असे ११ गट निश्चित करण्यात आले. यामधील महिला आरक्षणासाठी १७ पारवा, २९ ब्राह्मणवाडा, ३१ डोंगरकिन्ही, ३६ रिठद, ३५ गोवर्धन आणि २ भामदेवी हे गट निश्चित झाले.

अनुसूचित जमाती आरक्षण
लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार २६ किन्हीराजा, २५ राजुरा, १४ शेंदुरजना, ३० मेडशी हे चार गट आरक्षित ठरले. यात महिला आरक्षण २६ किन्हीराजा व ३० मेडशी या गटांना देण्यात आले.

नामाप्र (OBC) आरक्षण
१४ गटांसाठी सोडत काढण्यात आली. यात १८ कवठळ, ७ पोहा, २० तराळा, २४ आसेगाव, ६ काजळेश्वर, २७ जऊळका, १३ गिरोली, १ धनज बु, ३९ गोभणी, ३३ तिवळी, २३ कासोळा, ४३ काटा, ३ मनभा आणि १० कुपटा हे गट आरक्षित झाले. त्यापैकी ७ महिला आरक्षण १ धनज बु, १० कुपटा, १८ कवठळ, ६ काजळेश्वर, २४ आसेगाव, ३३ तिवळी आणि २३ कासोळा या गटांना देण्यात आले.

सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षण
अनुसूचित जाती, जमाती व नामाप्र आरक्षित गट वगळता उर्वरित २३ गटांपैकी १२ गट सर्वसाधारण११ गट महिला सर्वसाधारण म्हणून निश्चित करण्यात आले.

सर्वसाधारण गटांमध्ये ४ उंबर्डा बाजार, ५ कामरगाव, ८ धामणी, ११ तळप बु, १५ फुलउमरी, १९ दाभा, ३२ शिरपूर, ३४ केनवड, ४० वाकद, ४१ भरजहॉंगीर, ४५ वारा जहाँगीर, ४६ कळंबा महाली हे गट तर महिला सर्वसाधारण गटांमध्ये ९ इंझोरी, १२ आसोला खुर्द, १६ पोहरादेवी, २१ शेलू खुर्द, २८ पांगरी नवघरे, ३८ हराळ, ४२ चिचंबा भर, ४४ पाथर्डी टकमोर, ४७ तामसी, ५१ अनसिंग आणि ५२ वारला हे गट निश्चित झाले.

संपूर्ण सोडत प्रक्रिया पारदर्शक वातावरणात पार पडली. या वेळी लोकप्रतिनिधी, पत्रकार, नागरिक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही