महानगर पालिका बुडवते कर ; मनपा प्रशासनाला कुणाचा नाही डर

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
मिरज | वड्डी येथील ग्रामपंचायत कर थकबाकी न दिल्यामुळे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या विरोधात ग्रामपंचायत प्रशासनाचा कचरा डेपोसमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाला जोपर्यंत महानगरपालिका कडून कर भरणा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती प्रभारी सरपंच रमेश नाईक यांनी दिली आहे येणाऱ्या दोन दिवसात जर प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यास आंदोलन तीर्व करून महानगरपालिकेच्या येणाऱ्या गाड्या अडवण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे तातडीने याकडे प्रशासनाने लक्ष देऊन योग्य तोडगा काढण्याचे आव्हान ग्रामपंचायत प्रशासनाने केला आहे.
यावेळी आंदोलनावेळी रमेश नाईक ( प्रभारी सरपंच वड्डी), महेंद्रसिंग शिंदे सरकार (गट नेते), चंद्रकांत खोबरे (ग्रा. पं. सदस्य), अभिजीत मगदूम (ग्रा. पं. सदस्य), चंद्रकांत नाईक (अध्यक्ष तंटामुक्ती समिती), मारुती नाईक (सामाजिक कार्यकर्ते), नंदकुमार येसुमाळी (सामाजिक कार्यकर्ते), सुहास पाटील (अखिल भारतीय सरपंच परिषद अध्यक्ष मिरज तालुका), अनिल नाटेकर (सामाजिक कार्यकर्ते), मारुती नाईक नंदकुमार येसूमाळी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.