महाराष्ट्र राज्य

घरकुल न बांधता शासनाच्या निधीला चुना ; पंचायत समितीची सारवासारव, ज्यांच्याविरोधात तक्रार त्यांचेकडूनच घरकुल प्रकरणाची चौकशी? हा डाव जुना

वाशीम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

मंगरुळपीर तालुक्यातील चेहेल येथे काहींनी पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल न बांधताही जुनेच घर दाखवून शासनाचा निधी हडपल्याची लेखी तक्रार अतुल उमाळे यांनी प्रशासनाकडे केली होती. पण ज्यांनी संगनमत करुन जुनेच घर दाखवुन निधींचा अपहार केला त्यांनीच चौकशी करुन अहवाल सादर करुन प्रकरणी सारवासारव केल्याचा अजब कारभार केल्याने सर्वञ आश्चर्य व्यक्त होत आहे. ज्यांचेविरुध्द तक्रार आहे, त्यांच्या वरिष्ठाकडुन चौकशी होणे अपेक्षीत असतांनाही हे ‘अकलेचे तारे, कसे तोडले” हा प्रश्न तालुकावाशीयांना पडलेला आहे. याप्रकरणी कोणतीही कारवाई झाली नसुन दोषींना पाठीशी तर घातल्या जात नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत असुन कर्तव्यदक्ष मुख्य कार्यपालन अधिकार्‍यांनी या गंभीर विषयाकडे लक्ष देवू स्वतः घरकुल प्रश्नाची ‘स्पाॅट पाहणी’ करावी, अशी मागणी आता होत आहे.

वाशिम जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सन २०२३ ते २०२४ या कालावधीत निवासी प्रयोजनासाठी घरकुल बांधण्यास परवानगी देण्यात येऊन पहिला हप्ता तर काहींना दुसराही हप्ता वितरित करण्यात आला. शंभर दिवसात बांधकाम पूर्ण करणे अपेक्षित असतांनाही घरकुलांचे बांधकाम सुरूच झालेले नसल्याचे समोर आले तर काहींनी अर्धेच बांधकाम करुन काम थंडबस्त्यात ठेवलेले दिसते. काही ग्रामपंचायत कडून सात दिवसात घरकुलाचे काम पुर्ण करण्याच्या नोटीसही देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. परंतु, या नोटीसाठी जणु हवेतच विरल्या कारण यावरही पुढे कुठलीच कारवाई झाली नसल्याचे दिसते. घरकुल न बांधताच निधी हडप केल्याची बाब या नोटीशीव्दारे तक्रारकर्त्याने उपस्थित केलेला मुद्दा तर दाबायचा नाही ना अशी शंका आता निर्माण होत आहे. ज्यांनी घरकुल लाभार्थ्यांशी हितसबंध साधत जुनेच घर असूनही घरकुल न बांधता पुर्ण हप्ते काढल्याची तक्रार अतुल ऊमाळे यांनी करुन प्रशासनाला उपोषणाचा इशारा दिल्यानंतर एकच खळबळ उडाली.

तक्रारकर्त्यांनी माहीती परिपुर्ण न देता दिशाभुल करणारी अर्धवट दिली. प्रत्येक स्टेपला जिओ टॅंगीगचे फोटो न घेण्याचे कारण काय? तसेच दिलेल्या माहीतीनुसार सबंधितांनी घरकुल पुर्ण केल्यावरच चारही हप्ते दिल्याचे चौकशी अहवालात नमुद आहे. परंतु, सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे ज्या ग्रामपंचायत सचिव,सबंधित ग्रा.पं.पदाधिकारी, घरकुल विभाग यांनी संगनमत करुन शासनाची दिशाभुल करुन निधीचा गैरप्रकार केल्याची तक्रार असतांनाही सदर चौकशी ही सचिव, सरपंच, रोजगार सेवक व ग्रा.पं.कर्मचारी यांनी चौकशी करुन अहवाल बनवुन तक्रारकर्त्याला सादर केला आहे, तसे गटविकास अधिकारी यांनी लेखी कळवले. ज्यांचेविरोधात तक्रार आहे त्यांचे वरिष्ठ गटविकास अधिकारी किंवा जि.प.मुख्यकार्यपालन अधिकारी किंवा तत्सम वरिष्ठ अधिकार्‍यांकडुन चौकशी होणे अपेक्षित असतांना शासनाला चुना लावणारेच चौकशी करुन ‘अकलेचे तारे’ तोडत असल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणने असुन ही सावरासारव आता चालणार नाही, मी आमरण उपोषणावर ठाम आहे. असे तक्रारकर्ते अतुल ऊमाळे यांनी या प्रकरणी सांगीतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही