बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा म्हसळा विद्यमाने तोंडसुरे येथे वर्षावास प्रवचन मालिका संपन्न …

सौजन्य :- आयु. रुपेश गमरे
प्रा .विनायक कुमार सोनवणे यांनी “बौद्ध धम्म आणि विज्ञान” या विषयावरती गुंफले दुसरे पुष्प……
म्हसळा रायगड. दि.१८/८/२०२४
बौद्धजन पंचायत समिती तालुका म्हसळा यांच्या विद्यमाने वर्षावास प्रवचन मालिका २०२४चे आयोजन करण्यात आले असून प्रवचन मालिका पुष्प दुसरे रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ११.३० वा. तोंडसूरे बौद्धविहार तालुका म्हसळा जिल्हा रायगड येथे तोंडसुरे बौद्धजन ग्रामस्थ मंडळ मुंबई ग्रामस्थ व रमाई महिला मंडळ तोंडसुरे यांच्या सहकार्याने बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा म्हसळा यांच्या नियोजनाने संपन्न झाला कार्यक्रमच्या अध्यक्ष समाज भूषण स. भि.पवार गुरुजी, स्वागत अध्यक्ष हरिश्चंद्र मोहिते गुरुजी , उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण पंचशील घेऊन तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध ,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाना अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून अगरबत्ती प्रज्वलित करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविकेमध्ये बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा म्हसळा यांचे सरचिटणीस रुपेश गमरे यांनी बौद्धजन पंचायत समिती ही आपली मातृसंस्था आहे तिचा आदर्श ठेवून विकास करणे आणि तिला मोठे करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे . मातृसंस्थेचा कार्यकर्ता हा सक्षम निर्माण होण्यासाठी अशा प्रबोधनात्मक कार्यक्रमाची गरज आहे असे म्हटले ,या वर्षावासाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देताना तोंडसुरे मुंबई ग्रामस्थ चांगले सहकार्य केले त्याबद्दल ग्रामस्थांचे कौतुक केले. कार्यक्रमाला प्रमुख प्रवचनकार म्हणून प्राध्यापक विनयकुमार सोनवणे सर यांनी “बौद्ध धम्म आणि विज्ञान” या विषयावरती मार्गदर्शन करताना आधुनिक बौद्ध धर्म आपला उन्नतीचा मार्ग आहे धम्म आचरणात आणल्याशिवाय आपला विकास होऊ शकत नाही . असे प्रतिपादन केले. यावेळी ग्रामस्थ आणि बौद्धजन पंचायत समिती म्हसळा यांचे शीलाताई पवार आयु. प्रदीप पवार , मनोहर तांबे आनंत येलवे , सुधाकर येलवे, ग्रामस्थ मंडळ तोंडसुरे यांचे अध्यक्ष कृष्णा पवार मुकुंद कांबळे, प्रमोद पवार राजेश पवार, मीना पवार,
मोहन पवार, अनंत पवार, विलास पवार, संद्दीप पवार, मुकेश पवार ज्योती पवार, मनीषा पवार, हेमा पवार, मनोज पवार, नामदेव पवार, महिला मंडळाच्या अध्यक्षा सुषमाताई सुरेश पवार , प्रीती ताई पवार, कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आयु. प्रदीप पवार आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते वर्षावासानिमित्ताने सर्व उपासक उपासिका यांना मनोहर तांबे यांनी शुभेच्छा दिल्या .अध्यक्षीय भाषण करताना स.भी पवार गुरुजी धम्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी तरुण पिढी निर्माण होणे गरजेचे आहे अशी खंत व्यक्त केली. शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाला पूर्णविराम देण्यात आला.














