गुन्हे विश्व्महाराष्ट्र राज्य

दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार ; बदलापूरकर नागरिकांमध्ये संतापाची लाट ; रेल्वे वाहतूक ठप्प

मुंबई | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | आरु निकाळजे

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयिन मुली लघुशंकेसाठी जात असताना दोन कर्मचाऱ्यांनी त्या दोघींवर लैंगिक अत्याचार केला. दोघींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर पालक आणि बदलापूर करांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी आता कारवाई करण्यास सुरवात झाली आहे. आरोपी अटकेत असला तरी या संपूर्ण घटनेत पोलीस प्रशासनाने जो बेजबाबदारपणा दाखवला त्याप्रकरणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तत्काळ बदली करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शाळा प्रशासनाने मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि मुलांची नेआण करण्याची जबाबदारी असणाऱ्या सेविकांचे निलंबन केलं आहे.

या घटेनंतर संपूर्ण शहरात याचे पडसाद उमटले आहेत. ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेसमोर नागरिकांनी तथा पालकांनी आंदोलन सुरु केलं आहे. बदलापुरच्या रेल्वे ट्रॅकवर आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. रेल्वे, रिक्षा अडवण्यात आल्या आहेत. कल्याण-कर्जत रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. बंदलापूर बंदच्या दरम्यान, आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत. अप आणि डाऊनवरील वाहतूक ठप्प झाली आहे.

शाळेने जारी केलेल्या निवेदनात सध्याचा काळ शिक्षण संस्थेसाठी नाजूक असून या चिमुकल्या मुलींसोबत जो प्रकार घडला तो दुर्दैवी आणि निंदनीय असल्याचं शाळेनं म्हटलं आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सर्वस्वी शाळेचीच असून या घटनेनंतर संबंधित कर्मचाऱ्यांची तातडीने हकालपट्टी करण्यासोबतच ज्या खाजगी कंत्राटदाराच्या माध्यमातून हा कर्मचारी कंत्राटी पद्धतीने शाळेत काम करत होता, त्या कंत्राटदार कंपनीचा करार रद्द करून काळ्या यादी टाकण्यात आलं आहे. तसंच या प्रकरणात शाळेतील सीसीटीव्ही तपासण्याची जबाबदारी असलेल्या मुख्याध्यापिकांना निलंबित करण्यात आलं असून ज्या वर्गात या चिमुकल्या मुली शिकत होत्या. त्या वर्गाच्या वर्गशिक्षिका आणि लहान मुलींना प्रसाधनगृहात नेआण करण्याची जबाबदारी असलेल्या आया यांना थेट नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे.

शाळेत यापुढे सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी यापुढे अनेक उपाययोजना केल्या जाणार असल्याचे शाळेने म्हटलं आहे. तर या प्रकरणात आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पालक आणि पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य आणि कायदेशीर मदत संस्थेच्या वतीने केली जाईल, असंही शाळा प्रशासनाने म्हटलं आहे. शाळा प्रशासनाने घडलेल्या या प्रकाराबाबत सर्व पालकांची जाहीर माफी देखील मागितली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही