कलामनोरंजनमहाराष्ट्र राज्य

मिरजेत भाजपाची दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी : मिरजकरांचा उस्फूर्त प्रतिसाद ; तासगावच्या गोंविदा पथकाने फोडली दहीहंडी ठरले लाखांचे मानकरी

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | आदी माने

मिरज | “गो गो गो गोविंदा… गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा..” असा जयघोष सध्या मिरजेत पाहायला मिळत आहे. भाजपच्या वतीने दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. दरवर्षी प्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते सुशांतदादा खाडे यांनी या दहीहंडीचे आयोजन नेटके संयोजन करण्यात आले होते. यावेळी लाखो रुपयांचे पारितोषिक देण्यात आले आहे.

यंदाची भाजपाच्या दहीहंडी स्पर्धेत तासगावच्या शिवाजी युवक गोविंदा पथकाने सात थर लावून दहीहंडी फोडली. या संघाने १ लाख ५५ हजार ५५५ हजारांचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस पटकावले. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते सुशांतदादा खाडे यांनी या दहीहंडीचे आयोजन नेटके संयोजन करण्यात आले होते. लोकप्रिय टीव्ही मालिकेत संत बाळुमामांची भूमिका साकारणारे सुमित पुसावळे यांची उपस्थितीत लक्षवेधी होती. प्रेक्षकांतून बाळुमामाच्या नावानं चांगभलंच्या घोषणांनी देण्यात आल्या. डान्स इंडिया डान्स फेम मराठी कलाकार ऋतुजा जुन्नरकर यांच्या नृत्याचा कार्यक्रमाला प्रेक्षकांनी दाद दिली. घरोघरी मातीच्या चुली, रंग माझा वेगळा फेम रेश्मा शिंदे तसेच सुप्रसिध्द निवेदिका दीप्ती हलवाई यांचे निवेदन प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण करणारे होते. ऑलिम्पिक नेत्र दिपक आतषबाजी, लेझर शो, मुंबई डान्स ग्रुप यांच्या कार्यक्रमास प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला.

तासगावच्या शिवाजी युवक पथकाने पहिल्या प्रयत्नातच ७ थर लावून मिरजेच्या मानाची दहीहंडी फोडून जल्लोष केला. दहीहंडी फोडल्यानंतर सर्वत्र नेत्रदीपक आतषबाजी आणि लेझरशो यामुळे आसमंत उजळून निघाला होता. पहिल्या क्रमांकाचे बक्षिस राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्याहस्ते देण्यात आले. तर दहीहंडी सोहळा अलोट गर्दीमध्ये पार पडला. मिरज हायस्कूलचे क्रीडांगणावर हा सोहळा पार पडला. महिलांसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. अतिशय शिस्तबध्द पध्दतीने हा सोहळा पार पडला. या दंहीहंडी सोहळ्यासाठी मिरज शहर व ग्रामीण भागातून हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.विजेत्या गोविंदा पथकास राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्याहस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.

यावेळी आ.सुधीरदादा गाडगीळ, भाजपचे युवा नेते सुशांत खाडे, रयत क्रांतीचे आ. सदाभाऊ खोत, आ. गाोपिचंद पडळकर, पृथ्वीराज देशमुख, राजाराम गरूड, मनोजबाबा शिंदे, सुरेश आवटी, निरंजन आवटी, योगेंद्र थोरात, संदीप आवटी, वैभव नलवडे, सागर वडगावे, अमित कांबळे, बाबासाहेब आळतेकर, विक्रांत पाटील, जयगोंड कोरे, अजिंक्य हंबर, गजेंद्र कुल्लोळी, गणेश माळी आदी उपस्थित होते.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही