महाराष्ट्र राज्य

आरग येथील डॉ. दीपक शिंदे व गट प्रवर्तक मनिषा मूडसे यांच्याकडून आशा सेविकांना धमकी

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे

खटाव तालुका मिरज येथील आशा सेविकांना आरग येथील डॉक्टर दीपक शिंदे व गट प्रवर्तक मनीषा मूडसे यांनी अपमानास्पद वागणूक देऊन खटाव गावातील चारही आशा सेविकांना बघून घेण्याची दिली धमकी देण्यात आली आहे.

याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन होत असलेल्या अन्यायाबाबत माहिती दिली. खटाव गावातील शोभा सदाशिव हेळवी, दिपाली लोहार, गुंडवा नाईक आणि ज्योती नाईक या आरग उपकेंद्र अंतर्गत उपकेंद्र, खटाव मध्ये अशा सेविका म्हणून कार्यरत आहेत. दिनांक 11 सप्टें. 2024 रोजी आरग येथील पीएससीमध्ये डॉक्टर दीपक शिंदे यांना भेटण्यास गेल्या. डॉ. शिंदे यांना मानधन संदर्भात प्रश्न विचारले असता डॉक्टरांनी चक्क धमकी देऊन त्या चौघींना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. सगळे गाव सोडून फक्त एकट्या चार आशा सेविकांना कामाचे आधारे टार्गेट करणार आहे आणि तुम्ही चारही जण कसे काम करता असे बोलण्यात आले. याप्रकरणी सखोल चौकशी करून योग्य ते न्याय मिळावा यासाठी आज जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट घेऊन यासंबंधी निवेदन देऊन न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आलेली आहे.

याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तात्काळ चौकशी समिती गठित करून चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. मिरज तालुका आर्य अधिकारी यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी अहवालामध्ये दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही