सुरेश खाडे यांनी विकास केला तो निधी गेला कुठे? ; पोलखोल करणारे मोहन वनखंडे कोणत्या महाराजांकडे विचारण्यासाठी गेले का? ; डॉ.महेश कांबळेंचा घणाघात

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
मोहन वनखंडे यांनी चार दिवसात सुरेश खाडे यांची पोलखोल नाही केल्यास पाचव्या दिवशी दोघांची पोलखोल मी करणार असल्याचा इशारा डॉ.महेशकुमार कांबळे यांनी दिला आहे.
भाजप आणि आरएसएसच्या विचारसरणीचे मोहन वनखंडे यांनी गेली सतरा अठरा वर्षे झाले भाजपमध्ये राहिले त्यांची विचारसरणी ही भाजप आणि आर.एस.एस ची आहे. पालकमंत्री सुरेश खाडे आणि मोहन वनखंडे यांनी एकत्र संसार केला आहे. पण चार दिवसापूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी मोहन वनखंडे म्हणाले होते की, पंधरा वर्षात सुरेश खाडे यांनी विकास केला तो निधी गेला कुठे याची पोलखोल लवकरच करणार पण पोलखोल करण्यासाठी ते कोणत्या महाराजांकडे विचारण्यासाठी गेले आहेत का? की मूहूर्त बघत आहेत. असा घणाघात डॉ. महेश कुमार कांबळे यांनी केला आहे.
तसेच बीजेपी आणि आरएसएसचे वॉशिंग मशीन काँग्रेसने भाडे तत्त्वावर घेतला आहे का असाही आरोप महेश कांबळे यांनी यावेळी केला.तर हे येत्या चार दिवसांमध्ये पालकमंत्री सुरेश खाडे यांची पोलखोल नाही केल्यास या दोघांची पोलखोल पाचव्या दिवशी मी करणार असल्याचा इशारा डॉ.महेश कांबळे यांनी दिला आहे.