महाराष्ट्र राज्यराजकारण

महायुतीतील घटक पक्ष असलेला रिपाई (आठवले)पक्ष सांगली जिल्ह्यात स्वतंत्र उमेदवार उभे करण्याच्या तयारीत ; जगन्नाथ ठोकळे

सांगली | महाराष्ट्र दणका न्यूज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे

पश्चिम महाराष्ट्र कार्यकारणीच्या सातारा येथील बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पश्चिम महाराष्ट्राबरोबरच सांगली जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार देणार असल्याचे पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले. प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या सूचनेनुसार सांगली येथे प्रमुख पदाधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. त्या बैठकित हा निर्णय घेणेत आला.

भाजपने यापूर्वी दिलेल्या आश्वासनाचे पालन न केल्यामुळे तसेच लोकसभेला एक ही जागा न मिळाल्याने रिपब्लिकन पक्षाची भाजपवर तीव्र नाराजी असल्याचे यावेळी जगन्नाथ ठोकळे यांनी सांगितले. पुढे म्हणाले 2014 साली फक्त शिवसेना भाजपा युती असलेल्या भाजपला रामदासजी आठवले रिपब्लिकन पक्षाच्या सहभागाने महायुती बनवली केंद्रात राज्यमंत्रीपद दिले व अविनाशची महातेकर यांना सहा महिने राज्य मंत्रिपद तसेच महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ चेअरमन पद राजाभाऊ सरवदे यांना दिले. त्यानंतर रिपब्लिकन पक्षाला एकही पद दिले नाही.

महाराष्ट्र राज्यात रिपब्लिकन पक्षाची ताकद खूप मोठी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जरी आता आला असला तरी केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांच्यामुळे राज्यात महायुतीला मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. तरीसुद्धा परवाच्या महायुतीच्या बैठकीमध्ये रामदास आठवले साहेब यांना महायुतीचे परिपत्रक काढताना इलेक्ट्रिक मीडिया वरती त्यांचा कुठेही उल्लेख केला नाही या गोष्टीचा निषेध ही यावेळी व्यक्त करण्यात आला. ‌

अलीकडच्या काळामध्ये भाजपकडून रिपब्लिकन कार्यकर्त्यांची अवहेलना केली जात आहे.त्यामुळे सांगली जिल्ह्यातील आठ जागा लढवणार असल्याचे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव संजय कांबळे यांनी सांगितले.

रिपब्लिकन पक्षाचे जरी उमेदवार निवडून येत नसतील तरी कोणाला पाडायचे हे नक्कीच रिपब्लिकन पक्ष करतो याचे भान महायुतीच्या नेत्यानी ठेवणे आवश्यक आहे.रिपब्लिकन पक्षाची ताकद मोठी आहे हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला समजेल वारंवार रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष करून भाजपला येणाऱ्या निवडणुकीत त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे यांनी दिला.

सांगली जिल्ह्यातील आठ जागेवर रिपब्लिकन पक्ष आपले उमेदवार उभा करणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपले सर्व कागदपत्र तयार ठेवून ताकतीने कामाला लागण्याची आवाहन यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही