पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल : 29 ऑक्टोबरला शक्तीप्रदर्शन

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
संपादक | जयंत मगरे
राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतर, साधारणपणे सर्वच राजकीय पक्षांनी बहुतांश मतदार संघांतील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यानंतर आज अनेक ठिकाणी विविध पक्षांचे उमेदवार आपापला उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसत आहेत. यातच आज भाजप चे नेते मा.सुरेश खाडे यांनी सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. महत्वाचे म्हणजे, या मतदारसंघातून ते चौथ्यांदा उमेदवारी अर्ज भरत आहेत.
मिरज विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे हे मिरज मधून चौथ्यांदा भाजप कडून निवडणूक लढवत आहेत. आज त्यांनी आपला निवडणूकीचा अर्ज दाखल केला असून 29 ऑक्टोबरला जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याची माहिती दिली आहे.
यावेळी मिरज विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत उद्योजक अशोक खाडे, आरपीआय युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, पोपट कांबळे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान, शिवसेनेचे मिरज शहर अध्यक्ष किरण राजपूत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.