आरगेत पद्मावती माता देवीच्या गाभाऱ्यातील १८ तोळे सोने चोरी ; घटनास्थळी श्वान पथकासह, एलसीबी , फॉरेन्सिक लॅबचे पोलीस दाखल

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज | आरग येथील प्रसिद्ध पद्मावती माता देवीच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गाभाऱ्यातील देवीच्या अंगावरील १८ तोळे सोने चोरट्यानी लंपास केले आहे. मंदिराचे उपाध्ये पुजारी सकाळी पूजाअर्चा करण्यासाठी आले असता, हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने आरगेसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी मंदिराच्या बाजूस असणाऱ्या जिन्याने मंदिरात प्रवेश केला. गाभाऱ्यासमोरील लाकडी दाराची कडी कटवनींच्या साह्याने उचकटण्यात आली. गाभाऱ्यात प्रवेश करून देवीच्या अंगावरील सुमारे 18 तोळे सोने लंपास केले.
मंदिराचे पुजारी मंदिरात गेले असता मंदिराचे कडी
तुटल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना मंदिरात चोरी झाल्याचा संशय आला. त्यांनी तात्काळ मिरज पोलीस स्टेशनशी संपर्क साधुन सदरील घटनेची माहीती दिली. हा प्रकार उघड होतास भाविकांना मोठा धक्का बसला.
येथील लोकवस्तीत पद्मावती मातेचे मंदिर आहे. नेहमीच भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. पोलीसांनी मंदिर परिसरात पाहणी केली. सकाळी श्वान पथकासह, एलसीबी, फॉरेन्सिक लॅबचे पोलीस दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे.