बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास ठोकल्या बेड्या ; शहर गुन्हे अन्वेषन पथकाची कारवाई

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज | मिरज शहरातील एका बार परिसरात बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास मिरज शहर गुन्हे अन्वेषन विभागातील पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकून त्याच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयाने दि. ५ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे.
मिरज शहरातील राजहंस बारच्या परिसरात एक इसम बेकायदेशीर अग्निशस्त्रासह येणार असल्याची माहीती खबऱ्या मार्फत शहर पोलिसांना मिळाली. पो. नि. किरण रासकर यांच्या सूचनेनुसार सपोनि आण्णासाहेब गादेकर व गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने राजहंस बार परिसरात जावुन सापळा रचला. खबऱ्याने सांगितलेल्या
वर्णनाप्रमाणे एक इसम राजहंस बार मधून घाईघाईने बाहेर पडताच त्यास पोलीस पथकाने ताब्यात घेवून त्याचे नाव विचारले असता, त्याने गणेश उर्फ निहाल तानाजी कलगुटगी असे सांगितले. त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस मिळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून त्याचे विरोधात गुन्हा नोंद करुन अटक केली आहे. आरोपी गणेश ऊर्फ निहाल तानाजी कलगूटगी यास २ मार्च रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, यांचे समोर हजर केले असता, त्यास दिनांक ०५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कलगुटगी या आरोपीताविरोधात यापुर्वी गुन्हे दाखल असून त्याने सदरचे अग्निशस्त्र हे कोणत्या कारणासाठी जवळ बाळगले होते याबाबतचा पोलीस तपास करीत आहेत.
सदरील गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक आण्णासाहेब गादेकर हे करीत आहोत.