गिरगाव मेट्रो कामाचा फटका ; रस्ता खचला, बस 5 फूट खोल खड्यात अडकली

LiVE NEWS | UPDATE
मुंबई | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मुंबई | ठाकुरद्वार गिरगाव परिसरात मेट्रोच्या कामादरम्यान बेस्ट बसचा मोठा अपघात होण्यापासून टळल्याची घटना समोर आली आहे. मेट्रो प्रकल्पासाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे रस्ता अचानक खचला आणि बेस्टची बस तब्बल 5 फूट खोल खड्ड्यात अडकली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
गिरगाव परिसरात मेट्रो 3 कुलाबा वांद्रे काम सुरू आहे. गिरगाव मेट्रोच्या परिसराच्या शेजारील रस्ता खचल्याने बस बेस्ट पाच फूट खड्यात अडकून एक साईडला कोलंडली आहे. मुंबईत पाऊस सुरू असल्याने त्यात ही घटना घडल्याने चाकरमान्यांचे हाल झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. बसचे चाक रुतल्याने बस कोलंडत असल्याने प्रवाश्यांना त्या बसमधून तातडीने बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
याआधी ही याच परिसरात मेट्रोचे काम सुरू असतानाच अवजड क्रेन कोसळली आहे. त्यावेली हा मार्ग तीन दिवस बंद होता. मेट्रोचे होणारे काम आणि जनतेला होणार त्रास आणि रस्त्याची दुरवस्था याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.