“उभा राहिला विश्वासाचा कणा ; सेक्रेटरीपदाचा मान मिळाला विनोद निकाळजेंना”

LiVE NEWS | UPDATE
दिल्ली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
दिल्लीच्या राजकारणात एकदा पुन्हा आठवले वादळ
दि. २२ जुलै रोजी पार पडलेल्या केंद्रीय कमिटीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या नेतृत्वाचा निर्णायक टप्पा ठरला आहे. या बैठकीत पुन्हा एकदा बहुमताच्या जोरावर मा. ना. रामदास आठवले यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मात्र, या राजकीय रणभूमीवर दुसरा मोठा ‘फोकस’ ठरला तो म्हणजे *विनोद निकाळजे* यांचा झंझावाती प्रवेश…..
निकाळजे यांनी फक्त मैदान गाजवलं नाही तर केंद्रीय कमिटीच्या *राष्ट्रीय सेक्रेटरीपदावर बहुमताने मोहर* उमटवली. पक्षाच्या चळवळीत सातत्याने निष्ठेने झिजलेला हा कार्यकर्ता, आता राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचा चेहरा बनून समोर येतोय. त्यांच्या नावावर एकमुखी सहमती, टाळ्यांचा गजर आणि जयघोषाचा झंकार हे दृश्य रेकॉर्डमध्ये कोरलं गेलं.
यावेळी कार्यकर्त्यांच्या गळ्यात हार, मिठाईचा वर्षाव, ढोल-ताशांचा गजर आणि ‘निकाळजे साहेब जिंदाबाद’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास म्हणजेच कार्यकर्त्यांच्या मेहनतीची पावती असं म्हणत अनेकांनी सामाजिक माध्यमांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.
निकाळजे यांची निवड ही केवळ पदासाठी नाही तर संघटनाच्या मजबुतीसाठी त्यांचं गेल्या अनेक वर्षांपासून चाललेलं योगदान पाहता आलेलं फळ आहे. पक्षाच्या विस्तारात त्यांनी ग्रामीण भागात जसं काम केलं तसंच शहरी पातळीवरही युवकांना संघटनेत आणण्यासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय ठरले.
2016 मध्ये पक्षाचे राष्ट्रीय नेते मा. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार विनोद निकाळजे यांच्यावर ईशान्य भारतातील संघटन बांधणीची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने नागालँड व मणिपूरमध्ये संघटनात्मक ताकद निर्माण करत जनतेशी थेट संवाद साधला. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून दोन्ही राज्यांमध्ये पक्षाने आपली प्रभावी उपस्थिती निर्माण केली.
आज या दोन राज्यांमध्ये निवडणूक आयोगाकडून “राज्य पक्ष” म्हणून मान्यता मिळवणारा RPI (A) हा एकमेव रिपब्लिकन विचारधारेचा पक्ष ठरला आहे.
या पार्श्वभूमीवर आता त्यांच्या खांद्यावर पक्षाच्या संघटनात्मक बांधणीपासून ते आगामी निवडणुकांच्या रणनीतीपर कामगिरीपर्यंतची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. खुद्द रामदास आठवले यांनी निकाळजे यांचा उल्लेख “कार्यकर्त्यांमध्ये झळकणारा विश्वासाचा तारा” अशा शब्दांत केला.
*पक्षात ‘बदलासाठी नवचैतन्य’, नव्या नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा*
या निवडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याची लाट निर्माण झाली आहे. अनेकांनी आता पक्ष नव्या जोमाने मैदानात उतरेल आणि जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक जोमात लढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राजकीय वर्तुळात आता हा एक चर्चेचा विषय ठरला आहे की, विनोद निकाळजे यांच्यासारखा जमीनीवरचा कार्यकर्ता जर राष्ट्रीय नेतृत्वात चमकतो, तर कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळी ऊर्जा संचारते. आणि याच ऊर्जेचं रूपांतर लवकरच जनआंदोलनात होणार, हे नक्कीच…