गोवा-हुबळी मेडचा धमाका, हॉटेल ढाब्यांवर खुला तमाशा
गोवा व हुबळी मेड दारुची हाॅटेल, ढाब्यावर विक्री, दारु तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज तालुक्यात परराज्यातून गोवा व हुबळी मेड बनावट दारुची तस्करी करणाऱ्या टोळ्या अद्यापही सक्रीय असून तस्करीची दारु परमिटरुम बियर बार, ढाबे, व हाॅटेलमध्ये चोरट्यापध्दतीने पुरवठा करुन विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मद्यपींच्या आरोग्याला आव्हान देणाऱ्या व अशा दारूचा पुरवठा करणाऱ्या टोळ्यांचा उत्पादन शुल्क विभाग मुसक्या कधी आवळणार ? असा सवाल केला जात आहे.
“महाराष्ट्र दणका” न्युज चॅनेलने दारु तस्करीचे भांडाफोड करण्यास सुरुवात केल्याने संबंधित विभागाचा कारभार उघडा पडू लागला आहे तर शासनाचा महसूल बुडवून परराज्यातील हूबळी व गोवा मेड दारु मिरज, कवठेमहांकाळ, पलूस, विटा व जत तालुक्यातील ढाबे, हाॅटेल्सना पुरवठा करणाऱ्या टोळ्यामध्ये खळबळ उडाली आहे.
दारु तस्करी ही बरीच वर्षे जोमाने सुरु आहे मात्र, दारु तस्करीतून पुरवठा होणाऱ्या बनावट दारू मद्यपींच्या आरोग्यावर उटली आहे. रुग्णालयात बनावट दारुमुळे आतडे, लिव्हर तसेच पित्ताशयाच्या विकाराने त्रस्त झालेल्या मद्यपींची रुग्णालयात उपचारासाठी रेलचेल होत असल्याचे चित्र आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या टोळ्या बनावट दारु तस्करीत गुंतल्या आहेत. अनेक वेळा कारवाई करूनही त्यांना कारवाईची भिती का नाही? राजकीय की संबंधित विभागाच्या नेमका कोणाच्या अशिर्वादाने हा तस्करीचा काळा धंदा सुरू आहे, असाही सवाल व्यक्त केला जात आहे. तक्रारी किती वाढल्या तरी आमचे कोणीच काही करु शकत नाही या भावनेतून ही तस्करी जोमात सुरु असल्याची जोरदार चर्चा आहे.
नामवंत कंपन्याकडून विक्रीस येणारी, दारुसारखी वाटावी अगदी अशी लेबल लावून ती पुरवठा केली जात असल्याचे मद्यपींकडून सांगण्यात येते. एकच कंपनी मात्र, दरातही तफावत दिसून येत असल्याने बनावट दारुचा संशय बळावत आहे. नामवंत कंपनीपेक्षा कमी दराने बनावट दारु ढाबे, हाॅटेल व परमिटरुममध्ये फॅब्रिक होत असल्याने सतत या दारुचे सेवन केल्यानंतर विकार जडत असल्याचा दावा मद्यपीकडून केला जात आहे.
दारु उत्पादन शुल्क विभागाने अनेक वेळा सतर्कतेने कर्नाटक व गोव्यातून तस्करी होणाऱ्या दारु तस्करीला लगाम घातला असताना शासनाचा महसूल बुडविणारी दारुची तस्करी सुरूच रहाणे हे या विभागासाठी मोठे आव्हान आहे. दारु शुल्क विभाग या दारु तस्करीतील टोळ्यांचा कधी बंदोबस्त करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
शासनाकडे तक्रार करणार?
जिल्ह्यात परराज्यातून शासनाला चुना लावत होणाऱ्या दारु तस्करीची काही सामाजिक संघटनांनी दखल घेतली आहे. आरोग्यावर परिणाम करणाऱ्या विशेषत: शासनाचा महसूल बुडवून दारु तस्करीबाबत मुख्यमत्री, दारु उत्पादन विभागाचे मंत्री यांच्याकडे तक्रारी करणार असल्याचे समजते.