दारूचा अवैध धंदा धुडकावला ; कुपवाड पोलिसांनी ‘शामनगरच्या मस्तानी’ला पकडलं

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
कुपवाड (प्रतिनिधी) | दारूच्या गल्लीतून पोलिसांची गाडी धडकल्याने शामनगर हादरलं, कुपवाड शहरात देशी आणि गावठी दारूचा बिनधास्त व्यापार करणाऱ्या महिलेला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं. या धडाकेबाज कारवाईत ७,४६५ रुपयांचा दारू साठा हस्तगत करण्यात आला असून, कविता सचिन नगरकर (वय ३८) या महिलेविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाण्याच्या टाकीजवळ दारूचा धंदा
शामनगरमधील एका पत्र्याच्या शेडमध्ये, पाण्याच्या टाकीच्या आडोशाने चालणाऱ्या या गोरखधंद्याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली होती. पो.कॉ. प्रवीण ईश्वरा मोहिते (क्रमांक 1167) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सापळा रचत अचानक छापा टाकला आणि एका मोठ्या साठ्याचा पर्दाफाश केला.
दारूचा ‘हिसाब’…
● ₹1,760/- किमतीच्या **मॅकडॉल नं.1** व्हिस्कीच्या 180 एमएल बाटल्या
● ₹1,855/- किमतीच्या थ्री एक्स कंपनीच्या 90 एमएलच्या 53 बाटल्या
● ₹1,050/- किमतीच्या टॅंगो पंच कंपनीच्या 30 सीलबंद बाटल्या
● ₹2,800/- किमतीची २८ लिटर गावठी हातभट्टीची दारू (₹100/- प्रती लिटर) असा एकूण मुद्देमाल : ₹7,465/- जप्त केला आहे.
दारूवाली’ च्या अड्ड्यावर पोलिसांचा दणका
शहरात गेल्या काही दिवसांपासून गावठी आणि देशी दारूची चोरटी विक्री वाढली होती. यामुळे महिलांमध्येही भीतीचं वातावरण होतं. पोलिसांनी वेळेवर कारवाई करत या टोळीचा मोडता घात केला आहे. या प्रकरणी गुन्हा क्र. 140/2025 नोंद झाला असून कलम 65(ड) आणि 65(इ) अंतर्गत पुढील तपास सुरू आहे.
शामनगर हादरलं ; ‘दारूवाल्या बाईला’ पोलिसांचा हिसका..
कविता नगरकर हिच्या घराशेजारी सुरू असलेल्या दारूच्या धंद्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त होते. लहान मुलांपासून महिलांपर्यंत सगळ्यांनाच या अड्ड्यामुळे गैरसोयींचा सामना करावा लागत होता. अखेर पोलिसांनी ठोक कारवाई करत हा त्रास संपवला.
पोलीस ठरले ‘दारूबंदीचे वॉरियर’
शहरात दारूबंदी कायदा आहे, पण काही जणांना कायद्याची थोडीही भीती नाही. मात्र, कुपवाड पोलीस आता नव्या जोमात ‘दारू माफिया’ विरोधात मोहीम हाती घेणार आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.