मालगावात विकासाची उधळण ; खाडेंच्या हस्ते विविध कामांचं लोकार्पण

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज (मालगाव प्रतिनिधी) | गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने प्रगतीपथावर असलेल्या मालगाव या गावात गुरुवार दिनांक १ ऑगस्ट रोजी विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री व मिरज मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मालगाव येथील मातंग समाज मंदिर येथे उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. लोकशाहीर अण्णाभाऊंच्या विचारांचे स्मरण करत त्यांनी सर्व समाज बांधवांना एकजुटीचा संदेश दिला.
या कार्यक्रमात वॉर्ड क्रमांक १ मध्ये ५० लाख रुपयांच्या मंजूर निधीतील विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये विशेषतः ढोर चर्मकार वसाहतीसाठी २० लाख रुपये निधीतून नव्याने सभागृहाचे बांधकाम, मातंग समाजासाठी व्यायामशाळा उभारणीसाठी २५ लाख रुपये आणि चर्च हॉलसाठी ५ लाख रुपये निधीतून उभारणी अशी महत्त्वाची कामे समाविष्ट आहेत.
या कार्यक्रमास मिरज विधानसभा भाजपचे प्रमुख काकासाहेब अण्णा धामणे, ग्रामपंचायत सदस्या सौ. लक्ष्मी विजय नाईकवाडे, भागीरथी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. नीलम मयुर नाईकवाडे, तसेच गटनेते शशिकांत आना कणवाडे, सतीश आना बागणे, तुषार खांडेकर, अशोक हुंळे, तुकाराम खांडेकर, महेश सपकाळ, महेश मोरे, अभिनंदन सलगरे, बाळासाहेब भाणूसे, हरीभाऊ कांबळे, राजू होणमोरे, यशवंत वानमोरे, अनिल कदम, प्रमोद सोनवणे, नाना धामणे, जगन्नाथ जोडरटी, बाहुबली कोथळे, आदिनाथ शेडबाळे, बंडू झळके, दत्ता खांडेकर, दादा भंडारे, सचिन भंडारे, रॉबर्ट भंडारे, विनोद आवळे, आनंदा भंडारे, पिंटू केंगारे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व विविध समाज संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. डॉ. खाडे यांनी मालगावच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून आणखी निधी खेचून आणण्याचे आश्वासन दिले. सामाजिक समरसतेचा आदर्श घालून देणाऱ्या या गावाला पुढील काळातही सर्वसामान्य जनतेच्या गरजा ओळखून अधिक प्रगतिशील बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.