सडव्या मागे सडली गुन्हेगारी ; पोलिसांच्या धाडीने झाली होळी सारी

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
वाशिम जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या नेतृत्त्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेने चालवलेल्या कारवाईत गावठी दारू आणि सडवा मोहमाच या अवैध दारूच्या व्यवसायावर जबर दणका दिला आहे. एकूण ५ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दारूबाजांच्या गोटात धडकी भरवणारी ही कारवाई ग्रामीण भागात चर्चा आणि रोषाचा विषय बनली आहे.
पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आवर घालण्याचा निर्धार केलेला स्पष्ट दिसतो आहे. दारू, जुगार, गुटखा, शस्त्रसाठा अशा गैरकृत्यांवर सातत्याने कारवाया करून गुन्हेगारांच्या माजावर वचक निर्माण करण्यात आला आहे. त्यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने मोहगव्हाण, कृष्णा आणि कारंजा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील गावांवर अचानक छापे टाकले.
छाप्यांमध्ये सडवा मोहमाच दारू आणि गावठी हातभट्टीच्या बॅचेस मोठ्या प्रमाणात सापडल्या. पंचासमक्ष सगळी अवैध दारू तातडीने नष्ट करण्यात आली. आरोपींविरोधात कलम ६५ (ई), (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे आणि अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सपोनी जगदीश बांगर, शेखर मास्कर, बुध्दु रेघीवाले, गजानन अवगळे, सुरज खडके, आशिष बिडवे, दिपक सोनवणे, विनोद सुर्वे, दिलीप देवकते, गजानन गोटे, शुभम चौधरी, विठ्ठल महाल्ले, महिला पो.सुषमा तोडकर आणि चालक संदीप डाखोरे यांनी परिश्रम घेतले.