महाराष्ट्र
खटावचा बारूदफाटा ; सरपंच-ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे कॉल रेकॉर्डिंग ‘दणका’कडे ; भ्रष्टाचाराचा डोंगर उघडकीस येणार…

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
खटाव ग्रामपंचायतीच्या कारभारावर आधीच जनतेत असंतोषाचा वणवा पेटलेला असताना, आता लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे आणि ग्रामविकास अधिकारी संजयकुमार गायकवाड यांच्या संभाषणाचे स्फोटक कॉल रेकॉर्डिंग महाराष्ट्र दणका न्यूज च्या हाती लागले आहे. प्रशासनाच्या गलथान, बेफिकीर आणि संशयास्पद कामकाजावर हे रेकॉर्डिंग थेट शिक्कामोर्तब करणार असल्याचे संकेत आहेत.