महाराष्ट्रहवामान

कोयना धरणातून २१,३०० क्युसेक पाणी विसर्ग ; नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

सातारा | महाराष्ट्र दणका न्यूज नेटवर्क

पाटण | कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने धरणामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सहा वक्र दरवाजे उचलून विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. आज (मंगळवार) दुपारी ४ वाजल्यापासून हे दरवाजे १ फूट ६ इंचांवरून ३ फूटांपर्यंत उघडण्यात येणार असून, यामधून १९,२०० क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडले जाईल.

याशिवाय, धरण पायथ्यावरील जलविद्युत केंद्रातील दोन्ही युनिट कार्यरत असून, त्याद्वारे २,१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी कोयना नदीपात्रात एकूण २१,३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार आहे. पाण्याचा हा विसर्ग लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्राच्या आसपास न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे की पावसाची आवक पाहता विसर्गाची मात्रा परिस्थितीनुसार बदलवली जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही