महाराष्ट्रसामाजिक

मिरज संस्थांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे

मिरज संस्थांच्या गणपतीचे विसर्जन शनिवारी पारंपरिक पद्धतीने पालखी मिरवणूक काढून मिरज गणेश तलाव येथे करण्यात आले. या विसर्जन सोहळ्याचे नेतृत्व मिरज संस्थानचे युवराज श्रीमंत माधवराजे पटवर्धन महाराज यांनी केले.

मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथकांचे प्रदर्शन, पारंपरिक वाद्यांचे सूर आणि “गणपती बाप्पा मोरया”च्या गजरांनी शहराचे वातावरण दुमदुमले. पालखीतील सजविलेल्या गणेशमूर्तीला भक्तिभावाने भाविकांनी निरोप दिला.

या प्रसंगी माजी कामगार मंत्री व विद्यमान आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे, DYSP प्रणील गिल्डा, मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर, वाहतूक निरीक्षक सुनिल गिड्डे उपस्थित होते. प्रशासनाने विसर्जन मिरवणुकीसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था केली होती.

तसेच मान्यवरांमध्ये आदित्य बाबा घोरपडे सरकार, किशोर पटवर्धन, सुहास साळुंखे, ॲड. किरण जाबशेट्टी, ॲड. पृथ्वीराज पाटील, श्रीकांत जयगौंड, मारुती नाईक, वैभव पटवर्धन, विवेक कुलकर्णी, सागर मुळे यांचा सहभाग उल्लेखनीय ठरला.

मिरज येथील भुई समाज बांधव तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने या पारंपरिक सोहळ्यास उपस्थित राहिले. भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पाला “पुढच्या वर्षी लवकर या” अशा गजरात निरोप देण्यात आला.

संस्थात्मक परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडविणारा हा विसर्जन सोहळा सुव्यवस्थित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही