क्राईमगुन्हे विश्व्मराठवाडासामाजिक

ढाब्यावर दारू प्यायची गंमत महागात ; धाबा मालक तुरुंगात, ग्राहक थेट कोर्टात…

अवैध दारू सेवनाविरोधात कडक कारवाई, डझनभर धाब्यांना नोटिसा

लातूर | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

प्रतिनिधी | लातूर जिल्ह्यातील वलांडी परिसरात अवैध दारू सेवन आणि विक्रीचा बाजार मांडणाऱ्या धाब्यांवर अखेर उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली. या कारवाईत तीन धाबा मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पाच ग्राहकांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय परिसरातील डझनभर धाब्यांना नोटिसा बजावून कठोर इशारा देण्यात आला आहे.

तक्रारीनंतर कारवाईचा मार्ग मोकळा

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी 21 एप्रिल 2025 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, लातूर यांच्या आदेशानुसार वलांडी परिसरातील सहा धाब्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. यात स्पष्ट नमूद करण्यात आले होते की, दारू सेवनासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास कायदेशीर कारवाई होईल.

मात्र, इशाऱ्यानंतरही धाब्यांवर अवैध मद्यसेवन सुरूच राहिल्याने रफी यांनी 28 ऑगस्ट 2025 रोजी पुन्हा तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून विभागाने 11 सप्टेंबर रोजी सलग छापे टाकत कारवाई केली.

तीन धाब्यांवर गुन्हे, पाच जणांना अटक

या मोहिमेत वलांडीतील बाबा का ढाबा, सृष्टी लंच होम आणि हॉटेल साई ढाबा या तीन ठिकाणी कारवाई करत धाबा मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. कलम 68/84 अंतर्गत गुन्हे नोंदवून संबंधित तीन धाबा मालक व पाच ग्राहकांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित धाब्यांवर संशयास्पद कारभार आढळला नसला तरी सर्वांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 168 अन्वये नोटिसा देऊन भविष्यातील कारवाईची स्पष्ट चेतावणी देण्यात आली आहे.

प्रशासनाचा इशारा

दुय्यम निरीक्षक एस. पी. काळे यांनी अधीक्षक, उत्पादन शुल्क लातूर यांना पाठवलेल्या अहवालात नमूद केले आहे की, भविष्यातही अवैध दारू सेवनाविरोधात कठोर कारवाई सुरू राहील. कोणत्याही धाब्यावर दारू सेवन आढळल्यास त्वरित गुन्हा नोंदवला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

समाजाचा संघर्ष आणि विजय

या कारवाईमागे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचा सातत्यपूर्ण संघर्ष मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. समितीचे अध्यक्ष सौदागर रफी यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. उपोषणाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाला कारवाईस भाग पाडले गेले.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही