विदर्भ

उभ्या ट्रकला एसटी बसची जोरदार धडक ; सहा प्रवासी गंभीर जखमी

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
पंढरपूरहून अमरावतीकडे जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात वाशिमजवळ शनिवारी सकाळी झाला. २० सप्टेंबर रोजी सकाळी साधारण आठ वाजण्याच्या सुमारास कळंबा महाली गावाजवळ हा अपघात घडला. रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकला एसटी बसने जोरदार धडक दिल्याने सहा प्रवासी गंभीर जखमी झाले.

प्राथमिक माहितीनुसार, ट्रकचा टायर पंक्चर झाल्यामुळे तो रस्त्याच्या कडेला उभा होता. याचवेळी पंढरपूर-अमरावती मार्गावरून वेगात येणारी एसटी बस थेट ट्रकवर आदळली. धडकेचा आवाज एवढा मोठा होता की आसपासच्या गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तत्काळ वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. बसचे मोठे नुकसान झाले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही