Uncategorized

नितीन बनसोड यांच्या कार्याची दीपक केदार यांच्याकडून प्रशंसा

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
ऑल इंडिया पँथर सेनेचे वाशिम जिल्हा अध्यक्ष नितीन बनसोड गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले आहेत. जिल्ह्यात कुठेही अन्याय, अत्याचार अथवा वंचितांवर अन्याय झाला तर बनसोड तात्काळ धाव घेऊन पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहतात.

राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी त्यांच्यावर जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली तेव्हा ते तरुण आणि नवखे होते. मात्र अल्पावधीतच त्यांनी वाशिम जिल्ह्यात मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते घडवून संघटन मजबूत केले. आज पँथर सेनेचे शेकडो कार्यकर्ते जिल्ह्यात सक्रिय आहेत.

दलित पँथर ही 1970 च्या दशकातील प्रभावशाली चळवळ होती. त्या काळात दलितांवरील अन्याय, वंचना व भेदभावाविरोधात ही लढाऊ चळवळ उभी राहिली होती. त्याच परंपरेतून आजच्या 21 व्या शतकात ‘ऑल इंडिया पँथर सेना’ सामाजिक न्याय आणि हक्कांसाठी लढा देत आहे. या चळवळीत वाशिम जिल्ह्यात नितीन बनसोड यांनी विशेष योगदान दिले असून तेथील संघटन मजबूत केले आहे.

समाजातील कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी शेकडो कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेण्याची त्यांची तत्परता पाहून राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. पत्राद्वारे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यामुळे वाशिम जिल्ह्यातील पँथर सेनेच्या कार्याला नवी उर्जा मिळाली असून युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. नितीन बनसोड यांच्या नेतृत्वामुळे पँथर सेनेचे कार्यक्षेत्र अधिक भक्कम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही