क्राईमगुन्हे विश्व्विदर्भ

गोवंश वाहतुकीवर पोलिसांचा घाव ; २२ जनावरे मुक्त, ट्रक जप्त

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
वाशिम जिल्ह्यात अवैधरित्या गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत २२ जनावरे व १४ लाखांचा ट्रक जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरित्या केली.

२६ जून रोजी पहाटे तोंडगाव नाका परिसरात गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी उभारण्यात आली. दरम्यान, संशयित ट्रक (एमएच-४० बीजी ४०७६) थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वेग वाढवून पलायन केले. मात्र पोलिसांनी तब्बल १० किमी पाठलाग करून वाहन रोखले. तपासणीमध्ये २२ गोवंश जनावरे मिळाली.

चालक रमीस रजा खान (वय २५, रा. कामगारनगर, नागपूर) याने जनावरे कतलीसाठी हैद्राबाद येथे नेत असल्याची कबुली दिली. ट्रक व जनावरे मिळून सुमारे १८.२५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून जनावरे शिरपूर गोशाळेत सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. या प्रकरणी वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र गोवंश संरक्षण अधिनियम १९७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर अधीक्षक लता फड, उपविभागीय अधिकारी नवनीत अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रदीप परदेशी, सहाय्यक निरीक्षक योगेश धोत्रे, तसेच वाशिम ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक श्रीदेवी पाटील व त्यांच्या पथकातील जवानांनी मोलाची भूमिका बजावली.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही