महाराष्ट्रविदर्भ

विजया महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची प्रथम वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
कारंजा लाड येथील विजया महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडची प्रथम वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी संस्थेच्या मुख्य कार्यालय, सिटी हब कॉम्प्लेक्स येथे उत्साहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सौ. विजया दिनेश रघुवंशी होत्या.

या वेळी उपाध्यक्षा सौ. अंकिता नवगण, संचालिका सौ. शारदा उपाध्याय, सौ. मंदा ठाकुर, सौ. धनश्री ठाकूर, सौ. वर्षा घुले, सौ. उषा नवगण, सौ. वैशाली इंगोले, सौ. सोनाली बंदीवान, सौ. राधा गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे सभासद, कर्जदार व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

सभेचे संचालन प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. दिनेश रघुवंशी यांनी केले. तर शाखा व्यवस्थापक श्री. सदानंद नवगण यांनी अहवाल सादर करत संस्थेची आर्थिक प्रगती व भविष्यातील उपक्रम मांडले.

अध्यक्षा सौ. विजया रघुवंशी यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, महिलांना बचत करण्याची सवय लागावी, त्यांच्यासाठी वित्तीय साक्षरता कार्यक्रम राबवावेत, तसेच महिलांना उद्योगधंद्यात पुढे नेण्यासाठी मदत व्हावी हेच संस्थेचे ध्येय आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त बनविण्यासाठी विविध योजना राबविल्या जात असून त्याचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.

भागधारक, ग्राहक व कर्जदार यांच्या सहकार्यामुळे संस्था सतत प्रगतीपथावर असल्याचे नमूद करत भविष्यातही असेच सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. शेवटी संस्थेच्या कर्मचारी कु. अनुश्री शिरभाते हिने आभार प्रदर्शन केले.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही