देवदर्शनाला नेलेल्या पिकअपचा अपघातात ; ३ शिक्षकांसह १४ विद्यार्थी जखमी

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्यूज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
मंगरुळपीर तालुक्यातील धोञा तांडा शाळेतील काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पारवा येथील देवीच्या दर्शनासाठी नेले असता परतीच्या वेळी पिकअप पलटी झाल्याने ३ शिक्षकांसह १४ विद्यार्थी जखमी झाले. अपघातानंतर प्राथमिक उपचार करून गंभीर जखमी विद्यार्थ्यांना आणि तीन शिक्षकांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.

पालकांच्या मते, देवदर्शनासाठी विद्यार्थ्यांना नेण्याअगोदर शिक्षणविभागाची किंवा पालकांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. तसेच, काही विद्यार्थ्यांनीही या यात्रेला नकार दिला होता, तरीही शिक्षकांनी त्यांना जबरदस्तीने नेले. पालकांनी दोषी शिक्षकांवर तसेच मुख्याध्यापकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या पिकअपवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयात आणले. प्राथमिक उपचारांनंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये खुशी ठोंबरे, वर्षा मनवर, रणविर भगत, सम्यक भगत, दिलीप म्हातारमारे, हर्षल गीरी, श्याम ठोंबरे, भक्ती गावंडे, लकी भगत, नैतिक मनवर, कुंदन थोरात, सार्थक गायकवाड, प्रीती ठोंबरे आणि विशाल भगत यांचा समावेश आहे.
सध्या नवरात्र उत्सव सुरू असल्याने दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. पालक आणि स्थानिक नागरिक हे प्रकरण लक्ष ठेवत आहेत आणि पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि नियमबाह्य वाहन चालकांवर योग्य ती कारवाई करणे गरजेचे असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.