महाराष्ट्रसामाजिक

कामगारांचा विजय ; डोंबिवलीत नाकापुस्तिका वाटपातून संघटनेला अभूतपूर्व यश

कल्याण | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

डोंबिवली | बहुजन असंघटित कामगार संघटनेच्या संघर्षाला मोठा यश लाभले आहे. 23 सप्टेंबर रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने कामगार संघटनेच्या मागण्या मान्य केल्या आणि नाकापुस्तिका वाटपाचे आश्वासन दिले.

प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी डोंबिवली खंबाळपाडा येथील नाक्यावर अधिकारी उपस्थित राहिले आणि शेकडो कामगारांच्या सहभागाने नोंदणीसह नाकापुस्तिकांचे वाटप करण्यात आले. या नाकापुस्तिकांमुळे कामगारांच्या अधिकृत नोंदणीला गती मिळेल, तसेच मुलांच्या शिक्षण, आरोग्य सुविधा, मुलींचे विवाह आणि अन्य शासकीय लाभ थेट मिळणार आहेत.

भव्य कार्यक्रमात बहुजन असंघटित कामगार संघटनेचे प्रमुख डॉ. शंकरदादा माने यांनी प्रत्यक्ष नेतृत्व केले. त्यांच्या सोबत ठाणे जिल्हाध्यक्ष विकास इंगळे, कल्याण-डोंबिवली अध्यक्ष दीपक वाघ, डोंबिवली अध्यक्ष अमीन शेख, तसेच शॉप इन्स्पेक्टर विकास रोकडे आणि संपूर्ण टीम उपस्थित होती. त्यांनी कामगारांच्या प्रत्येक नोंदणीवर लक्ष ठेवून नाकापुस्तिका वाटप सुनिश्चित केले.

कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून, संघटनेला “कामगारांचे खरे हक्क मिळवून देणारी संघटना” म्हणून प्रत्यक्ष प्रतिष्ठा मिळाली आहे. संघटनेच्या या यशामुळे भविष्यातील कामगार अधिकारांच्या लढ्यांना मोठा हातभार लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सदर उपक्रमामुळे बहुजन असंघटित कामगार संघटनेचे नाव समाजामध्ये अधिक दृढपणे उजळले असून, संघर्षातून न्याय मिळविण्याचे ध्येय सिद्ध झाले आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही