महाराष्ट्रराजकीय

अजित पवार गटाचे आमदार इंद्रिस नायकवाडी यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक ; पोलिसांचा पंचनामा सुरू

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे

मिरज तालुक्यातील जानराववाडी येथे अज्ञात व्यक्तीकडून अजित पवार गटाचे तसेच विधानपरिषदेचे आमदार इंद्रिस नायकवाडी यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. मिरज पूर्व भागातील दौऱ्यावर असताना हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या या दगडफेकीत गाडीचे किरकोळ नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली आहे.

घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा सुरू करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. दगडफेक कोणी आणि का केली, याचा शोध पोलीस घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही