सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ला म्हणजे राष्ट्रावर हल्ला ; स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचा संताप
हा प्रकार राष्ट्रद्रोह ठरवा; आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करा ; हरेशभाई देखणे

LiVE NEWS | UPDATE
पुणे | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
देशाच्या सर्वोच्च न्यायासनावर विराजमान असलेल्या सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाने संपूर्ण देश हादरला आहे. या निंदनीय प्रकाराचा स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेने तीव्र निषेध नोंदवत, हा हल्ला न्यायव्यवस्थेवर नव्हे, तर थेट भारतीय लोकशाहीच्या प्राणावर झालेला आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
महासभेचे अध्यक्ष हरेशभाई देखणे यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे जिल्हाधिकारी मा. जितेंद्र डुडी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात त्यांनी मागणी केली की, सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा प्रयत्न हा राष्ट्रद्रोह ठरवावा आणि आरोपी राकेश किशोर याच्यावर तात्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी.
हरेश भाई देखणे म्हणाले की, “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चातुर्वर्ण व्यवस्था, जातीभेद, वर्णभेद संपवून समतेचा मार्ग दाखवला. पण काही जातीवादी प्रवृत्ती अजूनही मनातून नष्ट झालेल्या नाहीत. त्याच विषारी मानसिकतेतून हा हल्ल्याचा निंदनीय प्रयत्न झाला आहे. हा हल्ला म्हणजे न्यायव्यवस्थेवर नाही तर संविधान, समता आणि लोकशाहीच्या मूल्यांवर थेट आघात आहे.
जर या देशाच्या सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्याला सोडले, तर उद्या कोणताही गुन्हेगार संविधानावर गोळी झाडेल. म्हणूनच या प्रकाराला राष्ट्रद्रोह घोषित करून गुन्हेगाराला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. असा स्पष्ट इशारा स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
यावेळी महासभेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.