महाराष्ट्र

मिरज–एरंडोली–सलगरे मार्गावर कार-बाईक धडक; बाईकस्वार जखमी

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

प्रतिनिधी | जयंत मगरे

मिरज | मिरज–एरंडोली–सलगरे रोडवरील नवसाचा गणपती–पायापाची वाडी येथील वळणावर टाटा पंच कार (MH 10 EF 4111) आणि हिरो पल्स बाईक (KA 18 M 8417) यांच्यात जोरदार धडक झाली. धडकेत बाईकस्वार नागेश भंडारे जखमी झाले असले तरी, सुदैवाने कोणतीही गंभीर जीवितहानी झाली नाही.

स्थानिकांनी तत्काळ १०८ रुग्णवाहिकेला कॉल करून जखमी बाईकस्वाराला मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. नागरिकांनी तत्परतेने वाहतूक सुरळीत ठेवण्यात मदत केली.

धडक इतकी जबरदस्त होती की बाईकचे मोठे नुकसान झाले असून, कारलाही हानी पोहोचली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही