वाशिम जिल्हा व आंतरजिल्ह्यातील मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद
८.२४ लाख रुपयांच्या ९ बुलेटसह मोटारसायकली जप्त ; रिसोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
गेल्या काही दिवसांपासून रिसोड पोलीस स्टेशन हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटनांनी उचल खाल्ल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले होते. ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी डी.बी. पथकास विशेष सूचना देत तपास मोहीम सुरू केली.
तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी डी.बी. पथकाने संशयित इसम सचिन उर्फ मिठ्ठू अशोक मानकर (वय २८, रा. रामनगर, ता. रिसोड) यास ताब्यात घेतले. कसून चौकशीत त्याने वाशिम व हिंगोली जिल्ह्यातील मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीकडून एकूण ९ मोटारसायकली, त्यात ८.२४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे (IPS), अपर पोलीस अधीक्षक लता फड व सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, पोलीस हवालदार प्रशांत राजगुरू, महादेव चव्हाण, आशिष पाठक, रवि अढागळे, विनोद घनवट, परमेश्वर भोणे, सुनिल तिवाले, अमोल ठाकरे, विश्वास चव्हाण तसेच सायबर सेलचे संदीप वाकूडकर यांनी मोलाची भूमिका बजावली.