निर्मलाताई देखणे यांची पोलिस पाटील कामगार संघटनेच्या पुणे जिल्हा संघटक पदी निवड…
राज्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवडीचा कार्यक्रम पार ; शुभेच्छांचा वर्षाव

LiVE NEWS | UPDATE
पुणे | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
पोलिस पाटील गाव- कामगार संघटनेच्या पुणे जिल्हा संघटकपदी मा. निर्मलाताई हरेशभाई देखणे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब शिंदे पाटील, राज्य उपाध्यक्ष श्री. लक्ष्मण शितोळे पाटील, राज्य खजिनदार श्री. निळखंठ थोरात पाटील, पश्चिम कार्यध्यक्ष गोरक्ष नवले, पश्चिम अध्यक्ष साहेबराव राळे, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. तृप्तीताई मांडेकर पाटील, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा मोनिका कचरे, पुणे उपाध्यक्ष पप्पू काका राक्षे, खेड तालुका अध्यक्ष दिपक पावडे, अमोल पाचपुते, सयाजी शिंदे पाटील, कार्यकारी अध्यक्ष श्री. मारुती हुरसाळे पाटील, जिल्हा सदस्या सौ. रंजना पिचड पाटील, सरोज साळुंखे, सौ. स्वप्नाली पर्हाड पाटील, सविता माठे, राजश्री कचरे, कांताबाई पोखरकर, बळीराम गायकवाड पाटील, दौंड अध्यक्ष श्री. येचकर पाटील, तसेच जिल्हा सदस्या सौ. मीरा सावंत पाटील यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी निर्मलाताई देखणे यांच्या निवडीबद्दल समाधान व्यक्त केले व संघटनेच्या कार्यविस्तारासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. पोलिस पाटील बांधवांच्या हक्कांसाठी व सामाजिक प्रश्नांच्या निराकरणासाठी संघटनात्मक पातळीवर पुढील काळात अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार या प्रसंगी करण्यात आला.
निर्मलाताई देखणे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा पोलिस पाटील कामगार संघटनेचे कार्य अधिक मजबूत होईल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.