म्हैसाळ येथे आरोग्य शिबीरात ८१९ नागरिकांची तपासणी ; शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
म्हैसाळ (मिरज) | सहकारमहर्षी माजी आमदार कै. मोहनरावजी शिंदे म्हैसाळकर विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले. तब्बल ८१९ नागरिकांनी नोंदणी करून विविध आजारांची तपासणी करून घेतली. महिला व जेष्ठ नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला.
या शिबिराचे आयोजन मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. मनोजबाबा शिंदे-म्हैसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. शिबिरास सांगलीचे आरोग्य सेवक आयुबभाई बारगीर यांचे विशेष सहकार्य लाभले.
शिबिरात मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, लठ्ठपणा, रक्तक्षय, पोटाचे विकार, कॅन्सर, नेत्र, कान-नाक-घसा आणि सामान्य वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. सांगली येथील शासकीय रुग्णालय, मेहता हॉस्पिटल, चोपडे हॉस्पिटल, सुदर्शन हॉस्पिटल, शहा हॉस्पिटल, तसेच स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व आरोग्य कर्मचारी यांनी तपासण्या काटेकोरपणे पार पाडल्या.
शिबिराच्या सांगता समारंभात बोलताना म्हैसाळच्या माजी सरपंच सौ. मनोरमादेवी शिंदे-म्हैसाळकर म्हणाल्या की, गावागावांत आरोग्याबाबत सजगता वाढवणे ही काळाची गरज आहे. अनेक आजार वेळेवर निदान न झाल्याने गंभीर होतात. अशा शिबिरांमुळे नागरिकांना विनामूल्य तपासणी, त्वरित मार्गदर्शन आणि उपचाराची संधी मिळते. आमचा हा उपक्रम पुढेही सातत्याने सुरू राहील.
कार्यक्रमाला डॉ. मनोजबाबा शिंदे, मनोरमादेवी शिंदे, परेशबाबा शिंदे, शालीवाहन शिंदे, धनराज शिंदे, महावीर पाटील, दिलीपकुमार पाटील, नरसिंह संगलगे, नरेंद्र शिंदे, शिवलिंग सनबे, विशाल पाटील, नामदेव कोळी, सुनील चौगुले, सुनील वांडरे, अमोल चौगुले, गणेश निकम, मुस्ताक सौदागर, बाळासाहेब कनके, देवाप्पा आरगे, शशिकांत भोसले, सुनील कांबळे, बाळासाहेब माळी, किरण कळके, संदीप कांबळे, अनिकेत सावंत, तसेच विविध संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक व गावातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.