महाराष्ट्रसामाजिक

लिंगनूर येथे विश्व हिंदू परिषद-बजरंग दलातर्फे भव्य रक्तदान शिबिर ; १०० बजरंगींनी केले रक्तदान

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे

मिरज | लिंगनूर येथे हुतात्मा कारसेवक कोठारी बंधूंच्या स्मरणार्थ विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन २ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात भविष्यात भव्य मंदिर उभारले जावे, या महान ध्येयासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या कोठारी बंधूंच्या कार्याची कृतज्ञतेने आठवण ठेवत हे शिबिर घेण्यात आले.

रक्तदान शिबिरास पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक व भारतातील पहिले केशव शंखनाद पथकाचे संस्थापक श्री. नितीनजी (दादा) महाजन यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह लाभला. मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री ॲड. बाळासाहेब देशपांडे, कोषाध्यक्ष व्यंकटेशजी काबरा, लिंगनूरचे सरपंच मारूती (पिंदू) पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष नंदकुमार नलवडे, दूध विकास सोसायटीचे चेअरमन शिवाप्पा पाटील, उपाध्यक्ष सचिन मगदूम तसेच हिंदुत्वासाठी नेहमी तत्पर असलेले सुनिल दादा मगदूम, विजय मगदूम, दिलीप नाईक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मिरज तालुका प्रचार प्रमुख प्रा. सुभाष तेली उपस्थित होते.

शिबिरात लिंगनूर, शिंदेवाडी व खटाव येथील बजरंग दलाच्या तब्बल १०० बजरंगी कार्यकर्त्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. कार्यक्रमाचे नियोजन सांगली जिल्हा सह-संयोजक परशुराम नाईक व बजरंग दल लिंगनूर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुभाष तेली यांनी करून कार्यक्रमाला सुयोग्य दिशा दिली.

मानवसेवेच्या या उपक्रमामुळे लिंगनूर परिसरात सामाजिक कार्याची नवी प्रेरणा निर्माण झाली असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही