गुन्हे विश्व्विदर्भ

रिसोड पोलिसांची कारवाई ; बस स्थानकातील पाकीटमार २४ तासांत जेरबंद ; चोरीची ५२०० रुपये रक्कम हस्तगत

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

रिसोड पोलीस स्टेशनच्या पथकाने दाखवलेल्या तत्पर आणि उल्लेखनीय कामगिरीमुळे बस स्टॅण्ड परिसरात झालेली पाकीट चोरीची घटना अवघ्या काही तासांत उघडकीस आणत आरोपीस जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. फिर्यादी शिवाजी बळीराम जाधव (५४, रा. पानकन्हेरगाव, ता. सेनगाव, जि. हिंगोली) यांनी १७ नोव्हेंबर रोजी रिसोड पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, ते कपड्यांची खरेदी करून परत जाण्यासाठी दुपारी २.३० वाजता बस स्टॅण्डवर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पॅन्टच्या खिशातील ५२०० रुपये रोख रकम चोरून नेली होती.

तक्रार दाखल होताच पोलीस स्टेशन रिसोडचे ठाणेदार श्री. रामेश्वर चव्हाण यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी डीबी पथकास विशेष सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सीसीटीव्ही फूटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला. अत्याधुनिक पद्धतींचा वापर करून आरोपीची ओळख पटवण्यात आली व संशयित इसम सैय्यद जुनैद सैय्यद अब्दुल कदीर (२३, रा. आजम कॉलनी, हिंगोली) यास त्याच दिवशी बस स्टॅण्ड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिली. त्यानंतर पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतल्यावर चोरीस गेलेली ५२०० रुपये रक्कमही जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ. रमेश गोडघासे करीत आहेत.

ही संपूर्ण कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुज तारे (IPS), मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, मा. सहायक पोलीस अधीक्षक श्री. नवदिप अग्रवाल (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच ठाणेदार श्री. रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस हवालदार रमेश गोडघासे, अंमलदार विनोद घनवट, परमेश्वर भोणे, विनोद मस्के आणि सुधाकर सोन्नर यांनी विशेष मेहनत घेतली.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही