Uncategorized

“एसबीआय फाउंडेशन व चाइल्ड सर्वायवल इंडियाचा बाल हक्क जनजागृती उपक्रम उत्साहात पार”

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

मालेगाव प्रतिनिधी | सागर शिंदे

एसबीआय फाउंडेशन आणि चाइल्ड सर्वायवल इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा, सोमठाणा येथे चाइल्ड राइट्स सप्ताहानिमित्त विशेष बाल हक्क जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक व स्थानिक समुदायामध्ये बाल हक्क, सुरक्षा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, समान संधी आणि बाल संरक्षण या विषयांबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.

कार्यक्रमाच्या प्रारंभी चाइल्ड सर्वायवल इंडिया टीमचे प्रोजेक्ट मॅनेजर अनिकेत जाधव, डॉ. ज्ञानेश्वर काटे, विशाल जवंजाळ, अजहर खान आणि राजेंद्र अंभोरे यांनी उपस्थितांना बाल हक्कांचे महत्त्व, मुलांना सुरक्षित व पोषक वातावरणाची गरज तसेच शिक्षणातील समान संधी यांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारत संवादात्मक पद्धतीने कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी प्राथमिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यासोबतच चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. मुलांच्या कल्पकता, सर्जनशीलता आणि जागरूकता दर्शवणाऱ्या चित्रांचे परीक्षण करून विजेत्यांची निवड करण्यात आली. एसबीआय फाउंडेशन आणि चाइल्ड सर्वायवल इंडियाच्या वतीने विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

विजेते विद्यार्थी :
प्रथम : उन्नती विजय खंदारे, किशोरी कुंडलिक खंदारे
द्वितीय : अक्षरा एकनाथ खंदारे
तृतीय : ईश्वरी संदीप मापारी

पारितोषिक वितरण शाळेचे मुख्याध्यापक विलासराव नायक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षक रवी कुटे, कीर्ती रेडगे, संजय अंभोरे आणि श्रीहरी इंगोले उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये बाल हक्कांविषयी जाणीव निर्माण करण्यासाठी असा उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही