राजकीयविदर्भ

“दडपशाहीला जनता कंटाळली ; मंगरुळपीरमध्ये परळीकर लाट उसळली”

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

मंगरुळपीर नगरपालिका निवडणुकीत भयमुक्त, पारदर्शक आणि सुशासनाचा प्रशासनासाठी नागरिकांची मागणी अधिक प्रबळ होताना दिसत आहे. सध्याच्या दडपशाहीच्या वातावरणाला कंटाळलेल्या मतदारांनी यावेळी बदलाच्या दिशेने पाऊल टाकण्याचे स्पष्ट संकेत दिले असून, राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी समर्थित उमेदवार अशोकभाऊ परळीकर यांच्याकडे झुकणारा कल शहरभरात पाहायला मिळत आहे. त्यांचे नाव घराघरांत आणि जनमानसात दृढपणे पोहोचले आहे.

शहरातील प्रचारसभा, कॉर्नर मीटिंग्स आणि घराघरातील चर्चांमध्ये एकच आवाज मुखर होताना ऐकू येत आहे. “भयमुक्त मंगरुळपीर हवे” गेल्या काही वर्षांत अनुभवल्या गेलेल्या जातीय तेढ, दडपशाही, राजकीय सूडबुद्धी आणि ठप्प विकासामुळे नागरिकांमध्ये बदलाची तीव्र इच्छा निर्माण झाली असून, परळीकरांच्या नेतृत्वाला संधी देण्याचा दृढ निर्धार मतदारांमध्ये दिसून येत आहे.

अशोकभाऊ परळीकर यांनी दिलेला पारदर्शक प्रशासनाची हमी, सूडमुक्त कारभार, सर्वधर्म समन्वय आणि सर्वसमावेशक विकास या संदेशाला प्रभागनिहाय मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून असलेले नेतृत्व आणि सोबतच्या सर्व नगरसेवक उमेदवारांचा प्रचार शहरात उत्साहात सुरू असून, तरुण, महिला, व्यापारी आणि कष्टकरी वर्गाकडून मिळणारा प्रतिसाद पाहता निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस महाविकास आघाडीच्या बाजूने फिरताना जाणवत आहे.

मंगरुळपीरमध्ये अशोकभाऊ परळीकरांचीच क्रेज…

नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत विविध पक्षांच्या काही नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या असल्या तरी त्यांचा जनतेवर अपेक्षित प्रभाव पडलेला नाही. उलट, लोकांचे लक्ष आणि विश्वास परळीकर यांच्या दिशेने घट्ट होत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. “संकटात साथ आणि अशोकभाऊ परळीकर यांचा मदतीचा हात हेच नाव आमच्या मनात,” असे मतदारांचे स्पष्ट म्हणणे आहे.

मंगरुळपीरकरांच्या अपेक्षांना प्रतिसाद देणारे नेतृत्व म्हणून परळीकर यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून, शहरात त्यांच्या प्रचाराची जोरदार लाट पाहायला मिळत आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही