पाटण तालुक्यात पुन्हा “शंभुराज”
जिल्हा परिषद, पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व ; भाजपला पराभवाचा धक्का

LiVE NEWS | UPDATE
सातारा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | संजय कांबळे
पाटण | संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पाटण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकालात मंत्री शंभुराज देसाई यांनी भाजपला धोबीपछाड देत जिल्हा परिषदेत ६/१, तर पंचायत समितीत १३/१ असा दणदणीत विजय मिळवून तालुक्यात पुन्हा “शंभुराज” निर्माण केला आहे. भाजपला केवळ म्हावशी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण कसाबसा काठावर राखता आला आहे.
भाजप प्रवेशानंतरही पाटणकर गटाला मंत्री देसाई यांची घोडदौड रोखता आली नाही. पाटणकरांचे हेळवाक गट, चाफळ गण, सणबुर गण हे बालेकिल्ले उद्ध्वस्त झाले. निकालानंतर शिवसेना (शिंदे) मंत्री शंभुराज देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळत पाटण तालुक्यात जल्लोष साजरा केला.
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण उमेदवारांना पडलेली मते पुढीलप्रमाणे :
४७ गोकुळ तर्फे हेळवाक जि. प. गट
१) अशोक पाटील – (शिवसेना) – मते १०,५७९ – विजयी
२) दत्तात्रय कदम – (भाजप) – मते ९,५३३
३) संतोष कदम – (काँग्रेस) – मते ३४७
४) शिवाजी कांबळे – (ब.स.पा.) – मते १५८
५) महेश शेलार – शिवसेना (ठाकरे) – मते ४९०
६) प्रविण गुरव – (अपक्ष) – मते ५४
७) नोटा – ७३
९३ हेळवाक तर्फे पाटण पं. स. गण
१) मंगल माने – शिवसेना (शिंदे) – ४,८९५ – विजयी
२) वैशाली कांबळे – भाजप – ४,३३१
३) रेखा चव्हाण – शिवसेना (ठाकरे) – ४१६
४) पुनम माने – राष्ट्रीय काँग्रेस – २७४
५) नोटा – २२७
९४ येराड गण
१) विद्या शिंदे – (शिवसेना) – ५,७४२ – विजयी
२) वंदना शिंदे – (भाजप) – ४,९०८
३) रिया कांबळे – शिवसेना (ठाकरे) – २५२
४) नोटा – ४९
४८ तारळे जि. प. गट
१) स्वप्ना पाटील – (शिवसेना) – १४,३३३ – विजयी
२) डॉ. क्रांती साळुंखे – (भाजप) – ९,७३४
३) नोटा – ३७६
९५ मुरुड गण
१) सविता पवार – (शिवसेना) – ७,४५२ – विजयी
२) रेखा घाडगे – (भाजप) – ४,१३९
३) रुपाली निकम – (अपक्ष) – ३१९
४) नोटा – १३३
९६ तारळे गण
१) विकास जाधव – (शिवसेना) – ६,५०७ – विजयी
२) अभिजीत जाधव – (भाजप) – ५,५९२
३) नोटा – ३०१
४९ म्हावशी जि. प. गट
१) राजेश पवार – (भाजप) – ११,७६३ – विजयी
२) भरत साळुंखे – (शिवसेना) – ११,३८२
३) भरत ढेरे – शिवसेना (ठाकरे) – ५९१
४) अरविंद महाबळ – (मनसे) – १२०
५) महेश तोडकर – (अपक्ष) – ९२
६) नोटा – १३८
९७ म्हावशी गण
१) शंकर घाडगे – (भाजप) – ६,१६९ – विजयी
२) मंगेश मोळावडे – (शिवसेना) – ४,५३३
३) शिवाजी साळुंखे – शिवसेना (ठाकरे) – १६७
४) नोटा – ९८
९८ चाफळ गण
१) राधिका पाटील – (शिवसेना) – ७,४२७ – विजयी
२) कमल झोरे – (भाजप) – ५,५२३
३) नोटा – १७०
५० मल्हारपेठ गट
१) विजया कुंभार – (शिवसेना) – १६,२७५ – विजयी
२) सुजाता कुंभार – (भाजप) – ८,९४७
३) नोटा – ३३१
९९ मल्हारपेठ गण
१) अर्चना पाटील – (शिवसेना) – ८,२६८ – विजयी
२) सुमन चव्हाण – (भाजप) – ५,८३७
३) नोटा – २५५
१०० नाडे गण
१) विजय पवार – (शिवसेना) – ७,५६३ – विजयी
२) चंद्रशेखर ढवळे – (भाजप) – ३,३५३
३) विकास कदम – (रासप) – १६७
४) नोटा – ११०
५१ मारुल हवेली गट
१) योगिता गिरी – (शिवसेना) – १६,२०३ – विजयी
२) वैशाली गुरव – (भाजप) – ७,१६४
३) नोटा – २८५
१०१ मारुल हवेली गण
१) प्रियांका देसाई – (शिवसेना) – ९,३४७ – विजयी
२) पुनम मोरे – (भाजप) – २,७७४
३) विद्या सूर्यवंशी – (रासप) – ११६
४) नोटा – १३७
१०२ नाटोशी गण
१) प्रशांत पवार – शिवसेना (शिंदे) – ६,५८५ – विजयी
२) रंगराव जाधव – भाजप – ४,३९६
३) शांताराम सुर्वे – शिवसेना (ठाकरे) – २१३
४) नोटा – ८४
५२ मंद्रुळ कोळे गट
१) मृणाल पाटील – शिवसेना (शिंदे) – १४,३०४ – विजयी
२) डॉ. प्राची पाटील – भाजप – १३,२८५
३) नोटा – २२४
१०३ सणबुर गण
१) संपदा जाधव – शिवसेना (शिंदे) – ७,०६४ – विजयी
२) आकांक्षा खेडेकर – भाजप – ५,३१८
३) नोटा – १४०
१०४ मंद्रुळ कोळे गण
१) नितीन काळे – शिवसेना (शिंदे) – ७,७०३ – विजयी
२) नितीन पाटील – भाजप – ७,२२३
३) अमरजित पाटील – राष्ट्रीय काँग्रेस – १९४
४) साहिल भालेकर – शिवसेना (ठाकरे) – ८९
५) विलास सावंत – अपक्ष – २३
६) नोटा – ६०
५३ काळगाव गट
१) सुनिता चाळके – शिवसेना (शिंदे) – १३,५६० – विजयी
२) प्राजक्ता पाटील – भाजप – ८,६८२
३) सिताबाई मोडक – शिवसेना (ठाकरे) – ४२९
४) मेघना माने – अपक्ष – १३२
५) नोटा – १३७
१०५ कुंभारगाव गण
१) सचिन यादव – शिवसेना (शिंदे) – ६,३८० – विजयी
२) रमेश मोरे – भाजप – ४,८०४
३) संजय कळंत्रे – शिवसेना (ठाकरे) – ३९७
४) नोटा – २३८
१०६ काळगाव गण
१) पंजाबराव देसाई – शिवसेना (शिंदे) – ५,८१३ – विजयी
२) अनिल डाकवे – भाजप – ४,७११
३) संदिप माने – शिवसेना (ठाकरे) – २४४
४) आदित्य मोरे – राष्ट्रीय काँग्रेस – २४०
५) नोटा – ११३

भाजपच्या दिग्गजांना धक्का
मंद्रुळ कोळे गटातून माथाडी कामगार नेते ना. नरेंद्र पाटील यांच्या पत्नी डॉ. प्राची पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. राजकारणात नवख्या आणि अवघ्या २२ वर्षांच्या शिवसेना उमेदवार मृणाल पाटील यांनी डॉ. प्राची पाटील यांना अस्मान दाखवले. अटीतटीच्या या लढतीत अवघ्या २२ वर्षांच्या मुलीने नरेंद्र पाटील यांच्या पत्नीचा पराभव केल्याने संपूर्ण राज्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मृणाल पाटील या खऱ्या अर्थाने ‘जायंट किलर’ ठरल्या आहेत.
तसेच काळगाव जिल्हा परिषद गटात भाजपचे नेते ना. भरत पाटील यांच्या पत्नी प्राजक्ता पाटील यांना शिवसेना उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला असून, हा निकाल भरत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.