गुन्हे विश्व्महाराष्ट्रविदर्भ

अंमली साम्राज्यावर पोलिसांचा हल्ला ; तिन्ही ‘गांजा राण्या’ पोलिसांच्या जाळ्यात

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलिसांनी गुरुवार दि.७ ऑगस्टच्या रात्री अशी धडक कारवाई केली की, परिसरातील गांजा माफियांना काळजाचा ठोका चुकला. मेडशी–कोळदरा फाटा (अकोला–वाशिम रोड) येथे सापळा रचून, तब्बल ११.७०० किलो गांजा विक्री करत असलेल्या तिघी महिलांना पोलिसांनी रंगेहात पकडले. या मालाची बाजारातील किंमत तब्बल ₹ १,४०,००० आहे.

ही कारवाई रात्री ९.४० ते ११.३० वाजताचे दरम्यान झाली. अटक झालेल्या आरोपींमध्ये  मुक्ताबाई अशोक जाधव (वय-५२) व सुशीला भानुदास जाधव (वय-४५ रा. गणेशपुर, ता. मालेगाव, ह.मु. राजनगाव, जि. छत्रपती संभाजीनगर), सरस्वती गोपीचंद चव्हाण ( वय-७५, रा. धानोरा भुसे, ता. मानोरा, ह.मु. हिजवडी, जि. पुणे) यांचा समावेश आहे.

गुप्त माहितीवर पोलिसांचा सापळा…

पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, काही महिला गांजाची विक्री करत आहेत. ही बातमी कळताच पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रवि सैबेवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काटेकोर सापळा रचला. संशयितांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन योग्य वेळी धडक कारवाई करत त्यांना शिताफीने जेरबंद केले.

मोहिमेत सिंहाचा वाटा…

या मोहिमेत प्रो. पीएसआय शिल्पा लोंढे, एएसआय सुनंदा गाडे, एएसआय बेबीबाई, हेडकॉन्स्टेबल सुनिल पवार, शिवाजी काळे, मनिष राठोड, दिलिप राठोड, भानुदास निवाणे, विजेंद्र इंगोले, जितू पाटील, तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार, गणेश मेटांगले, धम्मकिर्ती घनबहादूर, वैशाली तायडे यांनी सहभाग घेतला.

NDPS अंतर्गत गुन्हा नोंद…

जप्त केलेला माल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, तिघींविरुद्ध मादक पदार्थ नियंत्रण कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास मालेगाव पोलिसांकडून सुरू आहे.

पोलिसांचा कठोर इशारा…

गांजा, दारू, मटका, जुगार अशा कुठल्याही बेकायदेशीर धंद्यांना वाशिम जिल्ह्यात मोकळीक नाही. अशा धंद्यांमध्ये सामील प्रत्येकाचा पत्ता पोलिस उखडणार, असा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही