क्राईममहाराष्ट्र

सांगलीत कौटुंबिक वादातून पत्नीचा खून ; शांतीनगर परिसरात खळबळ

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

प्रतिनिधी | श्रीकांत यमगर

सांगली शहरातील शांतीनगर परिसरातही रविवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. घरगुती वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत विवाहितेचे नाव काजल प्रशांत एडके (वय अंदाजे ३० वर्षे) असे आहे. तर तिचा पती प्रशांत एडके यानेच ही घटना घडवून आणल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घरगुती कारणावरून वाद निर्माण झाला आणि त्यातून हा खून झाल्याचे सांगितले जात आहे.

घटनेनंतर आरोपी पती प्रशांत एडके स्वतःहून पोलिस ठाण्यात जाऊन शरण आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे.

या घटनेमुळे शांतीनगर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत नागरिकांना शांत करण्याचे आवाहन केले. दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास सांगली शहर पोलिस करत असून या घटनेमुळे कौटुंबिक वादाचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही